देशात सध्या रब्बी हंगामातील गव्हाची काढणी पूर्ण झाली असून खरेदी केंद्रावर गव्हाची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम हा गव्हाच्या दरावर होऊन गव्हाचे दर घसरले आहेत.
पण केंद्र सरकारने गव्हाला हमीभाव देऊन गहू खरेदी करून घेण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) यासंबधीचा आराखडा तयार केला आसून 1 एप्रिलपासून त्या नुसार गव्हाची खरेदी करण्यात येणार आहे.
तर सरकारने पंजाबला गहू खरेदीसाठी सर्वाधिक कोटा दिला आसून यंदाच्या हंगामात 444 लाख मेट्रीक टन गव्हाची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट राहणार आहे.
पंजाब मध्ये गव्हाचे उत्पादन हे सर्वाधिक होत असल्यामुळे सरकारने पंजाब मधीन गव्हाला हामीभावाने खरेदी करण्यासाठी सर्वाधीक कोटा पंजाबला दिला आहे.तर यंदाही सर्वाधिक म्हणजेच 132 लाख टनाचा कोटा हा पंजाब राज्यासाठी ठरवून देण्यात आला आहे.
गेल्यावर्षी गव्हाला दिलेल्या आधारभूत किमतीचा फायदा शेतकऱ्यांना झाला होता. तर त्यात 86 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले होते. त्यात गेल्यावर्षी 443.44 लाख टन गव्हाची खरेदी ही झाली होती. तर 49 लाख 19 हजार 891 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला होता.
सध्या हमीभाव केंद्रावर गव्हाला आधारभूत किंमत 2 हजार 15 रुपये प्रतिक्विंटल ठेवण्यात आली आसून वखार महामंडळ आणि भारतीय अन्न महामंडळामार्फत गहू खरेदी केला जाणार आहे.