सांगली जिल्ह्यातील आटपाडी सारख्या दुष्काळानी ग्रासलेल्या तालुक्यात मासाळवाडी येथील तरुण शेतकरी आबासाहेब नाना मासाळ यांनी काही वर्ष परिसरातील डाळिंबाच्या शेतीत शेतमजुरी करून प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत स्वतःच्या शेतीत 15 एकरावर यशस्वीरित्या डाळिंब उत्पादन घेत आहेत.
आटपाडी तालुका कायम अवर्षणप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो. तरी येथील शेतकऱ्यांची जगण्याची जिद्द आणि कसोटी पाहिली तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून घेत येथील शेतकरी नेहमी शेतीत प्रयोगशील पथावर राहिला आहे.
तर येथील शेतीत टेंभू योजनेतून कृष्णा नदीचे पाणी फिरू लागल्याने शेतीचे चित्र बदलले आहे. अर्थात पाणी कधी वेळेवर येते कधी नाही पण मात्र येथील शेतकऱ्यांची शेतातील प्रयत्न थांबले नाहीत.
मासाळवाडी गावाचे तरूण शेतकरी आबासाहेब नाना मासाळ यांच्याकडे वडिलोपार्जित 20 ऐकर क्षेत्र असून त्याचे वडिल ज्वारी, बाजरी आदी पिके घेत तर आबासाहेबांची घरच्या गरीब परिस्थिती त्यांना त्यांचे शिक्षण दहावीनंतर सोडावे लागले.
व त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी मजुरी केली.परिसरातील डाळिंब बागेत बागा छाटणी, खांदणी ला जाण्याबरोबर आबासाहेबांना डाळिंब शेतीचे धडे घेण्यास सुरुवात केली.
2006 सालापासून त्यांनी पुढील पाच वर्ष जीवनात भरपूर संघर्ष केला. त्यानंतर त्यांनी आपला पूर्णवेळ शेतीस देण्यास ठरवत आई श्रीमती पारूबाई, पत्नी शशिकला, मुले जीवन व ओम असं त्यांचं छोटं कुटुंब आहे. वडिलांचे अलीकडेच म्हणजे सप्टेंबर २०२१ मध्ये निधन झाले. त्यांच्याकडून त्यांनी शेतीचे धडे घेतले.
आबासाहेबानी उद्दिष्ट आणि अभ्यास जोरावर हळूहळू डाळिंबी चे क्षेत्र वाढवले. सध्या १५ एकरांवरील डाळिंब बागेची लागवड केली आहे. त्यासाठी त्यांनी सुमारे ३० लाख रुपये खर्च करून आटपाडी तलाव गावापासून सात ते दहा किलोमीटर अंतरावरून पाईप लाईन करून आणली आहे.
त्याच्या शेतात चार विहिरी असून त्यांना पाणी अत्यल्प स्वरूपात आहे. त्यामुळे पाईप लाईन करून आणलेले पाणी त्यांनी विहिरीत सोडले आहे. विहिरीत साठवणूक केलेल्या पाण्याचा वापर आपल्या शेतातील डाळिंब बागेसाठी योग्य नियोजन पूर्वक करतात. तर विजय मरगळे, आणि अक्षय सागर यांचे मार्गदर्शन घेण्यात येते.
२०१७ पासून डाळिंबाची निर्यातही सुरू केल्याचे आबासाहेबानी सांगितले. तर यंदाच्या पावसात १२०० झाडांपैकी २०० झाडे खराब झाली आसून उर्वरित झाडे वाचविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.तर ही झाडे जोपासण्याचा खर्चही वाढला आहे.
डाळिंबाच्या लागवडीसाठी योग्य वाणाची निवड करणे गरजेचे असते. तर एक एकर डाळिंब क्षेत्रासाठी सुमारे 300 रोपांची गरज असते. दरवर्षी प्रति झाडाला २५ किलो शेणखताचा वापर होतो. ठिबकद्वारे पाणी देताना प्रत्येक झाडाला 8 लिटरचे दोन ड्रीपर अशा पद्धतीने सोय केली जाते.ताशी सरासरी १६ लिटर पाणी दिले जाते.
तर उन्हाळ्यात बाष्पीभवन होऊ नये यासाठी पाल्याचे आच्छादन करणे गरजेचे आसते.दरवर्षी मृग म्हणजे जून ते ऑगस्ट या तीन टप्प्यांत बहर धरला जातो.त्याची फळे जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान बाजारात येतात. एप्रिल ते मे या कालावधीत छाटणी केली जाते.एक ते दीड महिने बाग ताणावर सोडली जाते.
एकरी उत्पादन खर्च सुमारे अडीच ते तीन लाख रुपये होतो. डाळिंबाचे वजन २०० ग्रॅमपासून ते ६००, ७०० ग्रॅमपर्यंत मिळते. डाळिंब बागेत हे एकरी सरासरी ८ ते १० टन उत्पादन मिळते.तर प्रति झाडापासून २०, २५ ते ३० किलोपर्यंत माल घेण्यात येतो.
दर्जेदार डाळिंबाला सरासरी ९० ते १०० रुपये दर मिळतो. तर यंदा अन्य देशांना निर्यात करता आली नाही. परंतु देशांतर्गत बाजारात १२५ रुपये प्रति किलो दर मिळाला आहे.तर डाळिंबी च्या पिकातून आंतरपीक म्हणून पाच एकर क्षेत्रावर त्यांनी कलिंगडाची लागवड करून 20 ते 25 टनापर्यंत उत्पादन घेतले आहे.