Team Krushi Marathi :- मराठवाड्यातील बीड आणि जालना या जिल्ह्यात तुतीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.रेशीम शेतीचे वाढते महत्त्व त्यामुळे रेशीम शेतीच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे.तर जालना आणि बीड येथे खरेदी उपकेंद्राच्या माध्यमातून बाजारपेठही उपलब्ध झाली आहे. (The first silk quality testing center in Maharashtra)
जालना आणि बीड येथे खरेदी उपकेंद्र असली तरी, रेशीम कोषाची शेतकऱ्यांना गुणवत्ता कळत नसल्यामुळे त्यातील त्रुटी लक्षात येत नव्हत्या. त्यासाठी रेशीम कोषाचे गुणवत्ता तपासण्यासाठी शेतकऱ्यांना थेट कर्नाटकला जावे लागत असे.पण आता जालन्यातील खरेदी केंद्रावरच गुणवत्ता चाचणी सुरू होणार असल्याची माहिती रेशीम विभागाने दिली आहे.
रेशीम कोषांची जालन्यातील खरेदी केंद्रावरच गुणवत्ता चाचणी झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. आणि आपले रेशीम कोष कोणत्या गुणवत्तेचे आहे. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे कर्नाटक ला जाण्याचा शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा देखील वाचणार आहे.
रेशीम खरेदी उपकेंद्र जालन्यात
जालना जिल्ह्यात एप्रिल 2018 मध्ये रेशीम खरेदीचे पहिले उपकेंद्र सुरू करण्यात आले. यामुळे राज्यभरातील 15 हजार 550 शेतकऱ्यांकडून तब्बल 1हजार 350 टन रेशीम कोष खरेदी करण्यात आला. रेशीम कोष खरेदी साठी राज्यभरातीलच नव्हे तर कर्नाटकातील देखील व्यापारी दाखल झाले होते. आता खरेदी केंद्रावर कोष खरेदीबरोबरच त्याची गुणवत्ता चाचणी केंद्र देखील उभारण्यात आले आहे.त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.राज्यात गुणवत्ता चाचणी
केंद्र जालन्यात
जालन्यात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे रेशीम शेती बाजारपेठ दृष्टीने जालना महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनाही हक्काची बाजारपेठ मिळाली असून रेशीम कोषाला योग्य दर मिळत आहे. जालना बाजार पेठेतील रेशमची वाढती बाजारपेठ पाहता शेतकऱ्यांना विविध सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
बाजार पेठे जवळच रेशीम कोष चाचणी केंद्र उभारण्यात आले असून त्यामुळे शेतकऱ्याच्या रेशीम कोषाची गुणवत्ता तपासणी जाणार आहे. मराठवाड्यासह जालना जिल्ह्याचा रेशीम कोष उत्पादनात मोठा सहभाग आहे. खानदेश, विदर्भ, ठाणे, अहमदनगर येथील शेतकरीही जालना बाजारपेठच जवळ करीत आहेत.
रेशीम कोष गुणवत्ता चाचणी कशी केली जाते.
रेशीम कोष उत्पादक शेतकरी आपल्याकडे तयार झालेला रेशीम कोष विक्री करण्यापूर्वी काही कोषाचे नमुने तपासणी साठी तपासणी केंद्रावर आणतो. हे कोष हे कोष तपासणी केंद्रावर परीक्षणासाठी ठेवून त्यातील आळ्या या किती दिवसात बाहेर पडतील याचे परीक्षण केले जाते. त्या कोशातून किती उच्च प्रतीचा धागा निघेल हे परीक्षणानंतर कळणार आहे .चाचणी आधारे शेतकऱ्यांना त्यांच्या कोषाचा योग्य तो बाजारभाव मिळणार आहे.