PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होणार असून याबाबतची चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र हा हप्ता मिळण्याच्या अगोदर मागील 10 हप्त्याचा ज्या शेतकऱ्यांना लाभ घेतला आहे. अशा शेतकऱ्यांनी काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे.
11 हप्ता जमा होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.त्यासाठी शेतकऱ्याला आपला
आधार क्रमांक आणि आधारमध्ये दिलेला मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.आधारमध्ये दिलेला मोबाइल क्रमांक शेतकऱ्याकडे नसेल तर तो जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन अपडेट करून घ्यावा लागणार आहे.
यापैकी एकही नसेल तर तुम्हाला ई-केवायसी करता येणार नाही. पीएम किसानच्या ई केवायसीची शेवटची तारीख 31 मार्च आहे. त्यासाठी शेतकरी हा आपला केवायसी अर्ज मोबाईल द्वारे किंवा कॅम्पुटर द्वारे करू शकतो.पीएम किसान https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
पेजच्या उजव्या बाजूला ईकेवायसीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करण्याची गरज आहे. आपण क्लिक करताच एक नवीन पृष्ठ उघडेल. इथे सर्वात आधी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक केलं तर मोबाइल नंबर टाकण्याचा ऑप्शन येईल.
मोबाइल आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर 4 आणि 6 अंकांचे दोन ओटीपी तुमच्या मोबाईलवर येतील. ते टाकून, आपल्याला सबमिट फॉर ऑथेंटिकेशन पर्यायावर क्लिक करावे लागेल. तर सर्व काही ठीक झाल्यास ई केवायसी सबमिट असे शीर्षस्थानी येईल.
तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यात 2 हजार रुपयांचा 11 वा हप्ता देण्यात येणार आसून त्यासाठी पीएम किसानच्या ई केवायसीची पूर्तता 31 मार्च च्या आधी शेतकऱ्यांनी करून घ्यावी लागणार आहे.