यु-ट्यूब वरील व्हिडीओ पाहून शेतात नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंन दिवस वाढत आहे. नाविन्यपूर्ण शेतातील बदल विविध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेली शेती. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळवावे. यासंदर्भातील व्हिडिओ पाहून शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करून पाहत आहेत. व त्यात त्यांना यश देखील मिळत आहे.
आसेच वारोरा तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी एकाच वेळी ड्रॅगन फळाच्या वेलीची लागवड केलेली असून. त्यांची नाविन्यपूर्ण अशी शेती बघण्याकरता शेतकरी त्यांच्या शेतावर मोठ्या प्रमाणावर पाहणी करण्यासाठी गर्दी करत आहेत.
ड्रॅगन फळासाठी उष्णकटिबंध वातावरणाची आवश्यकता असते.ड्रॅगन फळ हे अनेक औषधी गुणधर्माने परिपूर्ण असे फळ आहे. ड्रॅगन फळाची वेल ही कॅक्टस सारखी असून त्याला काटे असतात.तर हे फळ कॅन्सर , डेंगू , हार्टअटॅक , मधूमेह या आजारांवर गुणकारी आहे.
पदवीधर शेतकरी मनीष मारोतराव पसारे यांनी यू-ट्यूबच्या माध्यमातून ड्रॅगन फळाबद्दल माहिती घेऊन त्यावर अभ्यास केला. आणि वरोरा तालुक्यातील शेगाव कृषी मांडल अधिकारी विजय काळे यांच्याशी ड्रॅगन फळ शेती बद्दल चर्चा केली. त्यावर कृषी अधिकारी विजय काळे यांनी शेतावर जाऊन त्याला मार्गदर्शन केले व प्रोत्साहन दिले.
लातूर , सांगोला येथे जाऊन दीड लाख रुपये खर्च करून ड्रॅगन फळाची रोपे आणली. त्यानंतर एक एकर क्षेत्रामध्ये बेड तयार करून घेतले.जून महिन्यात ट्रेलर पद्धतीने दोन फूट अंतरावर लागवड केली. यामध्ये ठिबक सिंचनाद्वारे पाणी देत असल्यामुळे पाण्याची बचत देखील होणार आहे. ड्रॅगन फळ उष्ण वातावरणात वाढत असल्यामुळे त्याला पाण्याची जास्त आवश्यकता नसते. आणि कुठलेही वातावरणाचा या पिकाला धोका नसतो.
लागवड केल्यानंतर पंधरा वर्षापर्यंत नवीन रोप लावण्याची आवश्यकता नसते. त्या वेलांची वारंवार छाटणी केली जाते. पहिल्या वर्षीच तीन ते चार लाखाचे उत्पादन व नंतर सात ते आठ लाखाचे उत्पादन मिळणे अपेक्षित असते. असे मत लागवड करणाऱ्या शेतकऱ्याचे आहे.
एकदा लागवड केल्यानंतर त्याची वारंवार छाटणी केली जाते. पंधरा वर्षांपर्यंत नवीन रोप लावण्याची आवश्यकता नसते. एक वर्षांनी फळ लागते. फळ झाडाला पिकते. पहिल्या वर्षी तीन ते चार लाखांचे उत्पादन, नंतर सात ते आठ लाखांचे उत्पादन अपेक्षित असल्याचे मत लागवड करणारे शेतकरी व्यक्त केले तर.वरोरा, चंद्रपूर, नागपूर बाजारपेठेत ड्रॅगन फळ विकण्याचा मानस असल्याचे या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
कोणत्या शेतकऱ्यांनी केली लागवड
वरोरा तालुक्यातील अमोल महाकुलकर व
अमोल पिसे ( माढेळी ) ,सुमित किनाके व मनीष पसारे (आबमक्ता), भूषण ठाकरे (सोनेगाव) .
फळातील पोषक घटक
एका, १.२ ग्रॅम विटामीन सी, तीन टक्के लोह, चार टक्के मॅग्नेशियम, दहा टक्के फायबर असते.
यात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम असल्यामुळे अनेक आजारांवर ते काम करते.