मुंबईकरांसाठी खुशखबर ! महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा बोरिवलीत; ‘या’ दोन ठिकाणाच अंतर होणार कमी, पहा याचा संपूर्ण रूटमॅप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thane News : मुंबई आणि उपनगरात सध्या वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वेगवेगळी रस्त्यांची कामे देखील सुरू आहेत. कोस्टल रोड, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, एलिव्हेटेड कॉरिडॉर यांसारखी मुंबई आणि एमएमआर रिजन मध्ये कामे सध्या वेगात सुरू आहेत. यामध्ये बोरिवली ते ठाणे टनेल रोड प्रोजेक्टचा देखील समावेश आहे. आता या टनेल रोड प्रोजेक्ट बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे.

या ठाणे ते बोरिवली दरम्यान विकसित होणाऱ्या बोगद्याचे काम आता लवकरच सुरू होणार आहे. कारण की, या प्रकल्पासाठीची निविदा उघडले लवकरच उघडली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे काम लार्सन अँड टुब्रो अर्थात एलएनटी आणि मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपन्यांना मिळण्याची शक्यता आहे. वास्तविक हा प्रकल्प 2015 मध्ये प्रस्तावित करण्यात आला आहे. परंतु याचे काम जलद गतीने होऊ शकले नाही.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता देशात सुरू होणार वंदे मेट्रो; ‘या’ महिन्यात दाखल होणार Vande Metro, काय असतील विशेषता? पहा…

आता या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. प्रकल्पासाठीची निविदा उघडल्यानंतर याचे काम निवड झालेल्या कंपन्यांच्या माध्यमातून होणार आहे.आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा 11.84 किलोमीटर लांबीचा बोगदा राहणार आहे. याचे काम एकूण दोन पॅकेज मध्ये पूर्ण होणार आहे. यामध्ये बोरिवलीकडे जाणारा ५.७५ किमी लांब जुळ्या ट्यूब रोडचा पॅकेज एक मध्ये समावेश राहणार आहे.

या टनेलचं डिझाइन लार्सन अँड टुब्रो कंपनीला दिलं जाणार आहे. तसेच पॅकेज दोनमध्ये ठाण्याकडे जाणाऱ्या ६.९ किमी लांब जुळ्या ट्यूब रोड टनलचं डिझाइन आणि निर्मिती करण्याचं काम मेघा इंजिनिअरिंगकडे दिल जाईल असं काही मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितलं गेल आहे. ठाणे-बोरिवली या बोगद्याची एकूण लांबी ११.८ किमी असेल. यात एक किलोमीटर लांबीचे रस्ते राहणार आहेत. म्हणजे अंडर ग्राउंड टनलची लांबी १०.८ किमी असणार आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘हा’ महत्त्वाचा रेल्वे मार्ग डिसेंबर महिन्यात होणार सुरू, वाचा सविस्तर

या मार्गावर ३ + ३ अशा लेन तयार केल्या जाणार आहेत. सध्या ठाणे ते बोरिवली हे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना दोन तास लागतात. या बोगद्यानंतर मात्र हे अंतर 15 मिनिटात पार होणार आहे. हा बोगदा पश्चिम उपनगर बोरिवलीतील मागाठाणे येथील एकता नगर आणि ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजी नी वाडी दरम्यान विकसित केला जाणार असून यासाठी 8900 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

निश्चितच, येत्या काही दिवसात या प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याने ठाणेकरांना तसेच बोरिवलीकरांना येत्या काही वर्षात या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. ठाणे ते बोरिवली हा प्रवास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात करता येणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे तसेच पैशांची देखील बचत होणार आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! आता देशातील ‘या’ महत्त्वाच्या मार्गावर सुरू होणार वंदे भारत ट्रेन, भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाचा मार्ग होणार सुकर; ट्रेनच्या उद्घाटनाची तारीख आली समोर

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा