तेज चक्रीवादळाचे महाचक्रीवादळात रूपांतर, अरबी समुद्र खवळला; ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवीन अंदाज काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tej Cyclone 2023 : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात अरबी समुद्रात तयार झालेल्या तेज चक्रीवादळाची मोठी चर्चा आहे. या चक्रीवादळाकडे भारतीय हवामान खात्यासहित प्रशासनाचे मोठे बारीक लक्ष आहे. चक्रीवादळामुळे कोणताच विपरीत परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.

दरम्यान, तेज चक्रीवादळाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेज चक्रीवादळाचे रूपांतर आता महा चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाचा वेग हा तब्बल 170 ते 200 किलोमीटर एवढा झाला आहे. अर्थातच या चक्रीवादळाचे तीव्रता आता खूपच अधिक झाली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे अरबी समुद्र प्रचंड खवळला असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे भारतीय हवामान खात्याने समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांना अति सावधानतेचा इशारा यावेळी जारी केला आहे. दरम्यान अरबी समुद्रातील हे तेज चक्रीवादळ 26 ऑक्टोबरला येमन आणि ओमानच्या दिशेकडे रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे.

या वादळाचा परिणाम म्हणून देशातील काही भागात मात्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारताच्या दक्षिणेकडील राज्यात या चक्रीवादळामुळे पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. मात्र महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा कोणताच विपरीत परिणाम होणार नाही आणि राज्यात कुठेच या चक्रीवादळामुळे पाऊस पडणार नाही असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

काय म्हटले हवामान खात्याने

काल अर्थातच 22 ऑक्टोबर 2023 रोजी तेज चक्रीवादळाचे रूपांतर महाचक्रीवादळात झाले आहे. यामुळे दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सावधानतेचा इशारा यावेळी हवामान खात्याच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे.

या चक्रीवादळामुळे अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग हा 150 ते 170 किलोमीटर प्रति तास एवढा झाला असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग 200 किलोमीटर प्रति तास एवढा होईल असा दावा केला जात आहे. यामुळे साहजिकच अरबी समुद्र नजीकच्या काळात आणखी खवळणार आहे.

यामुळे मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून मासेमारी करण्यासाठी कोणीही समुद्रात जाऊ नये असे स्पष्ट निर्देश जारी झाले आहेत. दरम्यान चक्रीवादळाचा वेग हा मंगळवार नंतर हळूहळू कमी होणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांमध्ये चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात वर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही हे पुन्हा एकदा हवामान खात्याने अधोरेखित केले आहे.

बंगालच्या उपसागरात पण तयार झाले चक्रीवादळ

एकीकडे अरबी समुद्रात तेज चक्रीवादळ सक्रिय झाले आहे. याची तीव्रता कालपासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात हूमान नावाचे चक्रीवादळ धुडगूस घालण्यास तयार होत आहे. बंगालच्या उपसागरात हुमान नावाचे चक्रीवादळ तयार झाले असून 2018 नंतर प्रथमच दोन चक्रीवादळ देशाच्या समुद्रसीमेवर धडकली आहेत.

सध्या स्थितीला मात्र हुमान चक्रीवादळ बाल्यावस्थेत आहे. हे चक्रीवादळ पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी आणि याची तीव्रता वाढण्यासाठी आणखी दोन दिवसांचा काळ लागणार आहे. हुमान चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. आज सायंकाळपर्यंत बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. दरम्यान हुमान चक्रीवादळाकडे भारतीय हवामान खात्याचे लक्ष लागून आहे.