Tata Solar Panel : अलीकडे वाढत्या वीज बिलामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. विजेचे दर सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांना बीज बिलाचा वाढता खर्च झेपावत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अलीकडे भारतात सोलर पॅनलचा वापर वाढला आहे. अनेकजण घराच्या छतावर सोलर पॅनल बसून वीजबिलापासून कायमची सुटका मिळवत आहेत.
दरम्यान जर तुमचाही घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याचा प्लॅन असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण टाटा कंपनीचा एक किलोवॅटचा सोलर पॅनल बसवण्यासाठी ग्राहकांना किती खर्च करावा लागू शकतो याची डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
यावरून तुम्हाला टाटा कंपनीचा एक किलो वॅटचा सोलर पॅनल परवडणार की नाही हे समजू शकणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
एक किलो वॅटचा सोलर पॅनल किती वीज तयार करतो
मीडिया रिपोर्ट नुसार एक किलो वॅटचा सोलर पॅनल दिवसाला चार ते पाच युनिट वीज तयार करण्याची क्षमता ठेवतो. टाटा कंपनीचा सोलर पॅनल देखील तेवढीच वीज निर्माण करू शकतो. यामुळे जर तुम्हाला दिवसाला चार ते पाच युनिट वीज लागत असेल तर तुम्ही एक किलो वॅट चा सोलर पॅनल बसवला पाहिजे. मात्र तुम्हाला यापेक्षा अधिक वीज लागत असेल तर तुम्हाला अधिक क्षमतेचा सोलर पॅनल बसवावा लागणार आहे.
कोणता सोलर पॅनल बसवावा
आपल्या भारतात दोन प्रकारचे सोलर पॅनल विशेष लोकप्रिय आहेत. एक म्हणजे ऑन ग्रीड सोलर पॅनल आणि दुसरा म्हणजे ऑफ ग्रीड सोलर पॅनल. ऑफ ग्रीड सोलर पॅनल मध्ये बॅटरी असते आणि ज्यामुळे लाईट गेल्यास देखील अशा प्रकारच्या सोलर पॅनलने वीज मिळत राहते.
कारण की अतिरिक्त वीज सोलर पॅनल मध्ये स्टोअर होत असते. मात्र ऑन ग्रीड सोलर पॅनल मध्ये असे घडत नाही. अर्थातच जर ऑन ग्रीड सोलर पॅनल बसवलेला असेल आणि लाईट गेली तर याचा काही फायदा होणार नाही.
हेच कारण आहे की, बाजारात ऑफ ग्रीड सोलर पॅनल महाग विकले जातात. दरम्यान आता आपण टाटा कंपनीचा एक किलो वॅट ऑफ ग्रीड सोलर पॅनल साठी किती खर्च करावा लागेल हे पाहणार आहोत.
किती खर्च लागेल
मीडिया रिपोर्टनुसार, TATA च्या 1 kW च्या 16 सिस्टीममध्ये तुम्हाला 320W चे 4 मॉड्यूल्स लागतील, आम्ही पॉली क्रिस्टलाइन सोलर पॅनेल बद्दल बोलत आहोत जे 26 रुपये प्रति वॅट दराने येते. अशा तऱ्हेने या सोलर पॅनल्सची किंमत सुमारे ₹9000 ते ₹10,000 पर्यंत जाऊ शकते.
तसेच, या 1 किलोवॅट सोलर सिस्टममध्ये तुम्हाला 100Ah किंवा 150Ah च्या 2 सोलर बॅटरीची आवश्यकता असेल, 100Ah सोलर बॅटरीची किंमत ₹12,000 आणि 150Ah सोलर बॅटरीची किंमत ₹17,0000 पर्यंत जाते. तसेच, टाटाच्या या 1 किलोवॅट सोलर सिस्टीममध्ये तुम्हाला 1.5kVa एमपीपीटी सोलर इन्व्हर्टरची आवश्यकता असेल, ज्याची किंमत ₹16000 ते ₹70000 रुपये इतकी असेल.
ही सौर यंत्रणा एका वेळी 900W पर्यंतचा भार उचलू शकते. शिवाय, सोलर सिस्टीम बसवताना तुम्हाला माउंटिंग स्ट्रक्चर, अर्थिंग किट, व्हायरस इत्यादी गोष्टींवर देखील खर्च करावा लागतो. हा संपूर्ण खर्च पाहता टाटाचे 1 किलोवॅट सोलर सिस्टीम इन्स्टॉल करण्यासाठी 65000 ते 70 हजाराचा खर्च करावा लागू शकतो.