सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गात बाधित शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला मिळण्याचा मार्ग झाला मोकळा, महत्त्वाचं पत्र जारी, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Surat Chennai Expressway : सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती येत आहे. खरं पाहता हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तीन तालुक्यातून प्रस्तावित करण्यात आला आहे. या मार्गाच जिल्ह्यात जवळपास 150 किलोमीटरच अंतर आहे.

बार्शी तालुक्यातील 15, दक्षिण सोलापूर तालुक्यातील चार आणि अक्कलकोट तालुक्यातील 25 गावातून हा मार्ग प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे या महामार्गाला जोडण्यासाठी शहराबाहेरून एक रिंग रोड देखील तयार केला जाणार आहे. हा रिंग रोड उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर मधून जात असून याची लांबी जवळपास 60 किलोमीटरचे राहणार आहे.

हे पण वाचा :- खुशखबर ! आता वर्धा ते नांदेड प्रवास होणार मात्र 4 तासात; वर्धा-नांदेड रेल्वे मार्ग ‘या’ महिन्यात सुरू होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा, वाचा….

या दोन्ही मार्गांची सोलापूर जिल्ह्यात मोजणी कम्प्लीट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मोजणीनंतर आता भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. मात्र या महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मान्य नाही. त्यामुळे संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोबदल्यात सुधारणा करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

जमिनीला रेडी रेकनर नुसार पाचपट अधिक मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडे निवेदन देखील सादर केले होते. या निवेदनाची आता दखल घेण्यात आली आहे आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे पत्र निर्गमित केल आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘त्या’ 14 लाख शेतकऱ्यांना पीएम किसानचा 14वा हफ्ता मिळणार नाही; पहा काय आहे प्रकरण?

सोलापुराच्या राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला हे पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग आणि रिंग रोड मध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या नुकसान भरपाई बाबत योग्य निर्णय घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

यामुळे आता या दोन्ही मार्गांमध्ये बाधित शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला मिळतो का? आणि जर मोबदला वाढेल तर किती वाढीव मोबदला मिळणार? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. एकंदरीत या महामार्गामध्ये बाधित शेतकऱ्यांच्या लढ्याला आता यश येणार असल्याचे चित्र तयार होत आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मुंबई ट्रांस हार्बर लिंकचा ‘हा’ महत्त्वाचा टप्पा पूर्ण, एमएमआरडीएने दिली माहिती

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा