अधिकचे उत्पादन घेण्यासाठी शेती ही जास्त असलीच पाहिजे असे काही नाही. तर कमी शेतीतून सुद्धा योग्य नियोजन केल्यास लाखो रुपयांचे उत्पादन घेता येऊ शकते. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथील शेतकरी पंकज आडकिने यांनी.
जरबेराच्या दहा गुंठे फूल शेतीमधून वर्षाकाठी सात लाख रुपयांचे उत्पादन घेत आहेत.शेतात नवनवीन प्रयोग करून त्याला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतीतून भरघोस उत्पादनासह अधिकचा नफा मिळवता येऊ शकतो. काही शेतकरी शेती परवडत नाही म्हणून हाताश होतात.तर शेती पिकाचे योग्य नियोजन केल्यास सहज नफा मिळवता येऊ शकतो.
शेतकरी पंकज आडकिने यांनी आपल्या 10 गुंठे शेतात हे करून दाखवले आहे. पंकज अडकिने यांनी फुलशेतीचे प्रशिक्षण पुणे येथून घेतले. त्यांनी फुल शेतीचे उत्पादन कसे घ्यावे, पाणी आणि फवारणीचा समतोल कसा राखायचा, यातून आर्थिक उत्पन्न किती होतं, काय मेहनत घ्यावी लागणार या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण घेऊन फुल शेती करण्याचे ठरवले.
अडकिने यांनी आपल्या 10 गुंठे जमिनीवर फुल शेतीसाठी पॉलिहाऊस उभारण्याचे ठरवली. त्यासाठी त्यांनी बँकेकडून 14 लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर त्यांनी पॉलिहाऊसमध्ये लाल मातीचा वापर करून तीन तीन फुटाचे बेड तयार करून घेतले.या बेडवर जरबेरा या फुलांच्या रोपट्यांची लागवड करून घेतली. जरबेराची फुल शेती पॉलिहाऊसमध्ये जरी केली तरी त्याची काळजी देखील त्याच पद्धतीने घ्यावी लागते.
उन्हाळ्यामध्ये तापमान वाढले तर तापमान नियंत्रणासाठी कूलर त्याचबरोबर पाण्याची फवारणी करून पॉलिहाऊसमधील तापमान स्थिर ठेवावं लागते. खूप कमी प्रमाणात पाणी, अत्यल्प मेहनत आणि अचूक वेळी फवारणी करावी लागते. जरबेराची रोपांची लागवड करताना त्यांना दोन लाख रुपये खर्च आला.
त्यानंतर आजपर्यंत या जरबेराच्या फूला पासून प्रत्येकी एका फुलाला दहा रुपये ते वीस रुपयांपर्यंत बाजार भाव मिळत आहे. अडकिने दररोज ही फुलं नांदेड आणि हिंगोलीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवून. त्यामधून त्यांना दररोज तीन ते चार हजार मिळत आहे. वर्षाकाठी पंकज अडकिने हे या फुलशेतीतून खर्च वगळता त्यांना पाच लाख रुपये निव्वळ नफा मिळत आहे.