Mango : कोकणातील आंबा उत्पादनाला ढगाळ वातावरण नंतर अवकाळी पाऊस यामुळे पहिल्या दोन हंगामातील उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.
आता आणखी नव्या संकटात आंबा उत्पादक शेतकरी सापडला असून आंब्याला वाढत्या उन्हाचा परिणाम दिसू लागला आहे.
अवकाळी पावसामुळे 60 ते 65 टक्के आंब्याचे नुकसान झाले असून आता उरला सुरलेला आंबा पुन्हा आडचणीत पडणार अशी कोकणातील आंब्याचे चित्र आहे. तर त्यासाठी आंबा उत्पादक चिंतेत आहे.
त्यासाठी आंबा उत्पादकांसाठी वेंगुर्ले येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सल्ला दिला असून त्याच्या मार्गदर्शकतत्वांचा अवलंब केला तर उत्पादनात सुधारणा होऊ शकरणार आहे.
फळे काढणीच्या वेळेस दरवर्षी वातावरण बदल हा ठरलेलाच असतो. मात्र आता अवकाळी पावसानंतर कडाक्याच्या उन्हामुळे झाडातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आंबा फळगळ व फळे फुटण्याचे प्रकारात वाढ झाली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आंब्याच्या झाडास पाणी जास्तीत जास्त द्यावे व भर दुपारी आंबे काढणी व भरणी करू नये असा आंबा बागायतदारांना सल्ला कृषी विद्यापीठाचे वनस्पती शास्त्रज्ञ संजय चव्हाण यांनी दिला.