पाण्याचा ताण सहन करणारी उसाची ‘ही’ जात देते अधिकचे उत्पादन अन साखरेचा उतारा ! वाचा याच्या विशेषता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane Variety : ऊस हे महाराष्ट्रसहित संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य बागायती पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर शेती केली जात आहे. या पिकाची शेती महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.

दरम्यान आज आपण उसाच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरेतर कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकाच्या सुधारित जातीची शेती करणे आवश्यक असते.

अशा परिस्थितीत आज आपण उसाच्या एका सुधारित जातीची माहिती पाहणार आहोत. आज आपण फुले १५०१२ या उसाच्या सुधारित जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

फुले १५०१२ ऊसाची सुधारित जात : कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडगाव ऊस संशोधन केंद्रात विकसित झालेली ही ऊसाची जात पाण्याचा ताण सहन करणारी आहे. अर्थातच, कमी पाणी असले तरी देखील या जातीपासून चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते.

या जातीपासून उसाचे विक्रमी उत्पादन मिळवता येते. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे सुरू, पूर्व आणि आडसाली अशा तीनही हंगामात या जातीच्या उसाची शेती केली जाऊ शकते.

उसाची ही जात चोपन जमिनीत देखील सहज वाढते आणि चांगले उत्पादन मिळते. तुरा अल्प प्रमाणात आणि उशिरा येतो. या जातीचे खोडवा उत्पादन देखील उत्तम आहे.

फुले १५०१२ या ऊस जातीपासून आडसाली हंगामातून हेक्टरी १८३ टन, पूर्व हंगामामध्ये १६३ टन आणि सुरूमध्ये १३७ टन एवढे उत्पादन मिळवता येते.

या जातीपासून तिन्ही हंगामात खोडवा पिकातून हेक्टरी १३० टन एवढे उत्पादन मिळवले जाऊ शकते असा दावा केला जात आहे.

खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड आणि खवले किडीस कमी प्रमाणात बळी पडते. पण साखरेचे प्रमाण या जातीत अधिक असल्याने मिलीबग किडीस काही प्रमाणात बळी पडते.

निश्चितच ऊसाची ही जात पाण्याचा ताण सहन करणारी असल्याने या जातीचा शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे.  

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा