ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! राज्यातील ‘या’ साखर कारखान्यांनी ऊसाला दिला 3 हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane Rate Maharashtra : ऊस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक प्रमुख नगदी पीक आहे. या पिकाची राज्यभर लागवड केली जाते. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रसह जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात उसाची लागवड होते. या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.

दरम्यान, यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा काळ शिल्लक आहे. येत्या काही दिवसात नवीन गाळप हंगाम सुरू होणार आहे. खरंतर, येत्या काही महिन्यात नवीन गाळप हंगाम सुरु होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री समितीच्या बैठकीत गाळप हंगाम केव्हा सुरू करायचा याबाबत निर्णय घेतील. मात्र, असे असतानाही अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना उसाची पूर्ण एफ आर पी दिलेली नाहीये. यामुळे ऊस उत्पादकांमध्ये साखर कारखान्यांविरोधात नाराजी आहे.

सरकार विरोधात देखील नाराजीचा सूर आवळला जात आहे. एफ आर पी लवकरात लवकर मिळावी यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी जोर धरत आहे. विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

दरम्यान गेल्या हंगामामध्ये राज्यातील 211 साखर कारखान्यांपैकी तेरा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांपेक्षा अधिकची एफ आर पी दिली आहे. मात्र 12 साखर कारखाने असे आहेत ज्यांनी दोन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिला आहे. दरम्यान आता आपण गेल्या हंगामात कोणत्या साखर कारखान्याने तीन हजारापेक्षा अधिकचा दर दिला आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

या साखर कारखान्यांनी दिला 3000 पेक्षा अधिक दर

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या गळीत हंगामात महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती, दूधगंगा (बिद्री), कुंभी (कुडित्रे) पंचगंगा (इचलकरंजी), वारणा साखर, दालमिया या साखर कारखान्यांनी तीन हजारापेक्षा अधिकचा दर दिला आहे.

तसेच सांगली जिल्ह्यातील राजारामबापू, राजाराम बापू युनिट-2 , राजाराम बापू युनिट – 3, सोनहिरा कारखाना, जी. डी. लाड कारखाना, दालमिया भारत या साखर कारखान्यांनी 3000 पेक्षा अधिकचा दर दिला आहे. तर सातारा जिल्ह्यातील कृष्णा (रेठरे) या कारखान्याने देखील तीन हजारापेक्षा अधिक दर दिला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा