Sugarcane Farming : ऊस हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यात अनेक बागायती भागात लागवड केली जाते. खरे तर उसाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.
मात्र असे असले तरी या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी याच्या सुधारित वाणाची लागवड करण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत आज आपण उसाच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत.
खरे तर आज आपण ज्या जातीची माहिती जाणून घेणार आहोत त्या जातीचे ऊस 15 फूट उंचीपर्यंत वाढतात. CO 3102 या उसाच्या वाणाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.
CO-3102 ऊसाच्या जातीची वैशिष्ट्ये
CO-3102 ऊस ही महाराष्ट्रासाठी शिफारशीत करण्यात आलेली ऊसाची एक मुख्य जात आहे. या जातीची लागवड जवळपास संपूर्ण भारतात केली जाऊ शकते.
हा वाण 2016 मध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. या ऊस जातीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याची लांबी जास्त आणि जाडीही जास्त आहे.
या जातीच्या उसाची लांबी 14 ते 15 फूट पर्यंत पोहोचते. एका उसाचे वजन ४ ते ५ किलो असते. ऊसाची ही जात चांगली रोगप्रतिकारक्षम आहे.
टॉप बोअरर, पोका बोअरिंग, रेड रॉट या रोगांना या जातीचा ऊस प्रतिकारक्षम आहे. विशेष म्हणजे या जातीपासून एकरी 500 ते 600 क्विंटल पर्यंतचा उतारा मिळत असल्याचा दावा केला जातो.
महाराष्ट्रातील हवामानात या जातींचे पीक चांगले विक्रमी उत्पादन मिळवून देते.राज्यातील हवामान या जातीच्या उसासाठी पोषक आहे.
यामुळे राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा विविध भागांमधील ऊस उत्पादक पट्ट्यात या जातीचे पीक उत्पादित केले जात आहे.
महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये या जातीचे पीक उत्पादित केले जाते. या जातीपासून अधिक टनेज मिळते शिवाय साखर उतारा देखील चांगला आहे. त्यामुळे या जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे.