Sugarcane Farming : महाराष्ट्रातील उसाच्या लागवडीखालील (Sugarcane Cultivation) क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. गेल्या वर्षी झालेल्या गाळप हंगामात (Sugarcane Crushing) महाराष्ट्राने साखर उत्पादनात (Sugar Production) एक नवीन विक्रम प्रस्थापित करत उत्तर प्रदेश राज्याला धोबीपछाड दिली आहे.
यावर्षी देखील उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली असावी असा तज्ञांचा अंदाज आहे. गेल्या वर्षी राज्यात उसाचे विक्रमी गाळप झाले असले तरी देखील अतिरिक्त उसाचा (Extra Sugarcane) प्रश्न संपूर्ण हंगामभर ऐरणीवर होता. दरम्यान यावर्षी देखील अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर राहणार असल्याचे चित्र एकदा पाहायला मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मित्रांनो यावर्षी गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजित आहे. मात्र राज्यात ऊस उत्पादक पट्ट्यात सर्वदूर पाऊस कोसळत असल्याने गाळप हंगाम पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं झाल्यास यावर्षी देखील अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. दरम्यान ऊस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Sugarcane Grower Farmer) एक दिलासादायक बातमी देखील समोर येत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात 200 साखर कारखाने गाळप करत होते.
मात्र यावर्षी गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये वाढ होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या वर्षी तब्बल दोनशे दहा साखर कारखाने ऊस गाळप करणार आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, सध्या राज्यातील 35 साखर कारखान्यांना ऊस गाळप हंगाम सुरू करण्याची परमिशन देण्यात आली आहे. मात्र हंगाम उशिरा सुरू होणार असल्याने यावर्षी गाळप हंगाम लांबणार आहे. खरं पाहता गाळप हंगाम जर नियोजित वेळेवर सुरू झाला तर एप्रिल 2023 पर्यंत गाळप हंगाम सुरु राहणार आहे. मात्र जर गाळप हंगामाला सुरूवात होण्यास विलंब झाला तर हा हंगाम मे 2023 पर्यंत चालू शकतो.
अशा परिस्थितीत अतिरिक्त उसाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. असं झाल्यास गेल्या वर्षीप्रमाणे ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा भुर्दंड देखील सहन करावा लागू शकतो. दरम्यान, जाणकार लोकांच्या मते या वर्षी ऊस उत्पादनात घट होणार आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, यंदाच्या गाळप हंगामात 138 लाख टन साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे. तसेच यावर्षी इथेनॉल उत्पादनातं वाढ होणार आहे.
या वर्षी 12 लाख टनांपेक्षा अधिक इथेनॉल उत्पादित होऊ शकतो असं साखर आयुक्तांनी स्पष्ट केल आहे. यावर्षी केंद्र सरकारने 10.25 टक्के साखर उतारा असलेल्या उसाला तीन हजार पन्नास रुपये प्रति टन एवढी एफआरपी घोषित केली आहे. महाराष्ट्राचा साखर उतारा 11.20 टक्के आहे. एकंदरीत ऊस गाळप हंगाम लांबल्यास अतिरिक्त उसाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर येणार आहे. यामुळे अधिक नुकसान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहे.