उसाच्या ‘या’ नवीन वाणातून मिळतंय अधिकचे उत्पादन अन साखर उतारा ! वाचा याच्या विशेषता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane Farming : ऊस हे महाराष्ट्र आणि देशातील विविध राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या विभागांमध्ये लागवड पाहायला मिळते.

एकंदरीत उसाची संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात शेती केली जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण उसाच्या एका नव्याने विकसित झालेल्या वाणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरंतर आता उसाच्या अनेक जाती विकसित झाल्या आहेत, पण आज आपण ज्या जातीविषयी जाणून घेणार आहोत ती जात टनेज आणि साखर उत्पादनाच्या बाबतीत आघाडीची ठरू लागली आहे.

हा नव्याने विकसित झालेला वाण विक्रमी टनेज देत आहे आणि या वाणातून साखर उतारा देखील चांगला मिळतं आहे.

कोणता आहे तो वाण

आम्ही ज्याविषयी बोलत आहोत तो वाण आहे फुले १५०१२. हा वाण फुले २६५ व को ९४००८ या दोन जातींपासून तयार केलेला एक सुधारित संकर वाण आहे.

उसाची ही नव्याने विकसित झालेली संकरित जात पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने तयार केलेली आहे. विशेष म्हणजे हा वाण तिन्ही हंगामात लागवडीसाठी उपयुक्त आहे.

या वाणाची सुरु आडसाली आणि पूर्व हंगामात लागवड केली जाऊ शकते. हा वाण क्षारयुक्त चोपण जमिनींतही लावला जाऊ शकतो.

कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीपासून आडसाली हंगामामध्ये 183 टन प्रति हेक्टर, पूर्व हंगामात 167 टन प्रति हेक्टर, सूरु हंगामात 137 टन प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळते.

विशेष म्हणजे खोडव्या उत्पादनातं देखील हेक्टरी १३० टनापर्यंत याचे उत्पन्न निघू शकते. ८६०३२ वाणापेक्षा यामध्ये १६ टक्के अधिक साखर उत्पादन आहे.

शिवाय या वाणाची 9 राज्यात लागवड होऊ शकते. आपल्या राज्यातील हवामान मात्र या जातीला विशेष मानवते. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा