शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; उसाच्या टॉप 3 सुधारित जाती कोणत्या ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane Farming : ऊस हे राज्यात उत्पादीत होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यभर लागवड केली जाते. हे एक प्रमुख बागायती पीक म्हणून ओळखले जाते. मात्र अलीकडे उसाची लागवड शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागली आहे. कारण की, दिवसेंदिवसं उसाची उत्पादकता कमी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना उसाच्या पिकातून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही.

तसेच उसाला अपेक्षित असा दर देखील साखर कारखान्यांच्या माध्यमातून दिला जात नाहीये. साखर उतारा दिवसेंदिवस कमी होत आहे. याशिवाय ऊस तोडणी मजुरांकडून आणि ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील केली जात आहे. या अशा विपरीत परिस्थितीमध्ये अलीकडे उसाची शेती शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र जर उसाच्या सुधारित जातींची लागवड केली तर ऊस पिकातूनही चांगले उत्पादन या ठिकाणी मिळू शकणार आहे. यामुळे आज आपण उसाच्या काही सुधारित जाती विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता थेट मुद्द्याला हात घालू या आणि उसाच्या सुधारित जाती जाणून घेऊया.

ऊसाच्या सुधारित जाती खालीलप्रमाणे

सीओ 05011 (करण-9)  : उसाची ही एक सुधारित जात आहे. या जातीची भारतात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या जातीपासून एकरी 34 टन पर्यंतचे उत्पादन मिळते. ही जात ICAR-Sugarcane Breeding Institute प्रादेशिक केंद्र, कर्नाल आणि भारतीय ऊस पैदास संशोधन संस्था यांनी सामूहिक प्रयत्नातून विकसित केली आहे. या जातीची लागवड ऊस उत्पादकांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे.

सीओ- 0124 (करण-5) : गव्हाची ही देखील एक सुधारित जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऊस पैदास संशोधन संस्था, कर्नाल आणि ऊस पैदास संशोधन संस्था, कोईम्बतूर येथील शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे ही जात विकसित केली आहे.  ही जात बागायती भागात उपयुक्त ठरते. ही जात मध्यम उशीरा पक्व होणारी एक प्रमुख जात आहे. ही जात ज्या भागात पाणी साचते तिथे विशेष उपयुक्त ठरत आहे. विशेष बाब म्हणजे ऊसाची ही जात लाल रॉट रोगास प्रतिकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जातीपासून एकरी 30 टन पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे.

सीओ- 0237 (करण-8) : भारतातील अनेक भागात या जातीची लागवड केली जाते. हा वाण आगात लागवडीसाठी उपयुक्त ठरतो. या जातीपासून एकरी 28 टन पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी उसाचा हा वाण खूपच उपयुक्त ठरत आहे.