शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! ऊसाला तुरा का येतो ? कृषी तज्ञांनी दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane Farming : ऊस हे महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागात मोठ्या प्रमाणात लागवड पाहायला मिळते. खरे तर ऊस हे एक नगदी पीक अर्थातच कॅश क्रॉप म्हणून ओळखले जाते.

या पिकातून शेतकऱ्यांना शाश्वत आणि तात्काळ चांगला पैसा उपलब्ध होत असल्याने याला नगदी पिकाचा दर्जा मिळाला आहे. पण अलीकडे हे नगदी पिक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी देखील ठरत आहे. कारण की उसाचे उत्पादन गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

ऊस उत्पादन घटण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. यापैकीच एक कारण आहे उसाच्या पिकाला तुरा येणे. उसाच्या पिकाला तूरा आला तर उसाचे टनेज घटते आणि साखरेचा उतारा देखील कमी मिळतो. परिणामी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्यांना याचा फटका बसतो.

दरम्यान आज आपण ऊस पिकाला तुरा येण्याचे नेमके कारण काय याबाबत कृषी तज्ञांनी दिलेली महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून शेतकऱ्यांना ऊसाला तुरा येण्याचे कारण समजू शकेल आणि तुरा येऊ नये यासाठी शेतकऱ्यांना योग्य व्यवस्थापन करता येईल.

ऊस पिकाला तुरा येण्याची प्रमुख कारणे खालीलपैकी

कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीचे तापमान हे तुरा येण्यासाठी पोषक ठरते. नत्राचा पुरवठा कमी झाला की उसाच्या पिकाला तुरा येऊ शकतो. यामुळे पिकाला पुरेसे आणि संतुलित प्रमाणात नत्र देणे आवश्यक असते.

याशिवाय लागवडीचा हंगाम सोडून जर उसाची लागवड करण्यात आली तर अशा पिकाला तुरा येण्याचे प्रमाण अधिक असल्याचे पाहायला मिळाले आहे.

हंगाम सोडून लागवड केलेल्या उसाला अवघ्या सहा महिन्यातच तुरा लागल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले आहे. यामुळे ऊसाला तुरा लागू नये यासाठी वेळेवर आणि हंगामात ऊस लागवड करणे आवश्यक आहे.

एक जूनला देण्यासाठी तोडलेल्या उसाच्या खोडव्याला सुद्धा तुरा येतो. पिकाचे वय पूर्ण झाल्यानंतर तुरा येतो. नैसर्गिकरित्या ऊस पीक 10 ते 12 महिन्यांचे झाले की त्याला तुरा लागतो. खोडव्यापेक्षा लागण केलेल्या ऊसाला अधिक तुरा येत असल्याचे सांगितले जाते.

खोडवा घेताना किंवा नवीन लागवड करताना पाचट जाळल्यास अधिक प्रमाणात तुरा येत असल्याचे सांगितले जाते. यामुळे खोडवा घेताना किंवा नवीन ऊस लागवड करताना पाचट जाळू नये असा सल्ला दिला जात आहे.

कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तुरा येण्याचे प्रमाण हे उसाच्या जातीवरही अवलंबून असते. काही जातींमध्ये उशिरा तर काही जातींमध्ये लवकर तुरा येत असतो. यामुळे उसाची लागवड करताना उशिरा तुरा येणाऱ्या जातींची निवड केली पाहिजे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा