Sugarcane Farming : ऊस हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक नगदी पिक आहे. दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
खरे तर येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच केंद्र सरकारच्या माध्यमातून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे.
मात्र आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची नाराजी केंद्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. यामुळे केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.
मोदी कॅबिनेटने ऊसाच्या एफ आर पी मध्ये गेल्या हंगामापेक्षा मोठी वाढ केली आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळणार अशी अशा व्यक्त होत आहे.
किती वाढला FRP ?
देशाच्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार कुठे ना कुठे बॅक फुटवर आले आहे.
पण, अशातच आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी उसाची एफआरपी आठ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रातील मोदी सरकारने आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, 2023-24 या हंगामासाठी केंद्र शासनाने उसाला 315 रुपये प्रति क्विंटल एवढी FRP लागू केली होती.
आता मात्र यामध्ये केंद्र शासनाने आठ टक्के वाढ केली असून 2024-25 या हंगामासाठी उसाची एफ आर पी 340 रुपये प्रति क्विंटल अशी झाली आहे.
अर्थातच गेल्या हंगामापेक्षा यामध्ये 25 रुपये प्रति क्विंटलची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान हा सुधारित एफआरपी एक ऑक्टोबर 2024 पासून लागू केला जाणार अशी माहिती समोर येत आहे.
केंद्र शासनाने 1 ऑक्टोबर पासून हा सुधारित एफआरपी दर लागू करण्याच्या सूचना संबंधितांना निर्गमित केल्या आहेत. 10.25% साखर उतारा असलेल्या उसाला ही FRP लागू राहणार आहे.