10 गुंठ्यात 10 लाखाची कमाई, पुण्याच्या महिला शेतकऱ्याचा स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Women Farmer : पुणे जिल्ह्यातील शेतकरी कायमचं नवनवीन प्रयोग करत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातील एका महिला शेतकऱ्याचा प्रयोग समोर आला आहे. या महिला शेतकऱ्याने फक्त दहा गुंठे शेत जमिनीतून दहा लाखाची कमाई करून दाखवली आहे.

त्यामुळे सध्या या प्रयोगशील महिला शेतकऱ्यांची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यातील चिंबळी गावात राहणाऱ्या सीमा चंद्रकांत जाधव यांनी पारंपारिक पीक पद्धतीत बदल करून स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला आहे.

विशेष म्हणजे सीमाताईंनी अवघ्या 10 गुंठे स्ट्रॉबेरी लागवडीतून 10 लाखांची कमाई केली आहे. दरम्यान आता आपण सीमाताईंची ही यशोगाथा जाणून घेणार आहोत.

सीमाताईंनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची रोपे मागवली. त्यांनी पाच हजार रोपे मागवलीत आणि आपल्या दहा गुंठे जमिनीत याची लागवड केली. नाभीला जातीची स्ट्रॉबेरी त्यांनी लागवड केली.

त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीसाठी मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा वापर केला. विशेष म्हणजे स्ट्रॉबेरी लागवड केल्यानंतर त्यांनी सेंद्रिय खतांचा वापर केला. यामुळे त्यांना खूपच कमी उत्पादन खर्च लागला.

विशेष म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर केलेला असतानाही दोन ते अडीच महिन्यात त्यांचे पीक हार्वेस्टिंगसाठी तयार झाले. सीमाताईंनी सांगितले की त्यांनी तयार झालेली स्ट्रॉबेरी व्यापाऱ्याला न देता ग्राहकांना विक्री केली आहे.

त्यामुळे त्यांच्या मालाला चारशे रुपये प्रति किलो असा भाव मिळाला आहे. त्यांना दहा गुंठे जमीनीतून 2500 किलो माल मिळणार आहे.

यामुळे त्यांना या पिकातून जवळपास दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. तसेच खर्च वजा जाता त्यांना नऊ लाख रुपये निव्वळ नफा राहणार आहे.

एकंदरीत शेतीमध्ये केलेला बदल आणि शेतमाल विक्रीसाठी आत्मसात केलेले नवीन तंत्र त्यामुळे सीमाताईंना शेतीमधून लाखो रुपयांची कमाई झाली आहे. अलीकडे अनेक शेतकरी पुत्र कमी जमिनीमुळे शेतीमधून चांगले उत्पादन मिळवता येत नसल्याचा ओरड करतात.

पण सीमाताईंनी फक्त 10 गुंठ्यात अन अडीच ते तीन महिन्यांच्या काळात रुपयांची कमाई करून या नवयुवकांना चांगली चपराक लावली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा