Successful Farmer: मित्रांनो अलीकडे शेतीमध्ये (Farming) शेतकरी बांधव मोठा बदल करत आहेत आणि हा बदल काळात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार ठरत आहे.
शेतकरी बांधव (Farmer) सध्या आपल्या शेतात नगदी पिकांची (Cash Crop) लागवड करून तसेच भाजीपाला (Vegetable Crop) आणि फळबाग लागवड करून चांगले पैसे कमवत आहेत.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने देखील पीक पद्धतीत मोठा बदल करून शेती व्यवसायात लाखो रुपये कमावण्याची किमया साधली आहे.
अलीकडे सुलतानपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा कल भाजीपाला आणि फळांच्या लागवडीकडे वाढताना दिसत आहे. अशाच शेतकरी बांधवांपैकी एक आहेत सुलतानपूरचे चंद्रशेखर उपाध्याय.
चंद्रशेखर सुलतानपूर जिल्ह्यातील धनपतगंज भागातील सेवरा व देवरा गावातील रहिवाशी शेतकरी आहेत. जे सुमारे 13 वर्षांपासून आपल्या शेतात फळे आणि भाजीपाल्याची लागवड करत आहेत.
सध्या त्यांनी त्यांच्या शेतात तैवान जातीच्या टरबूज-खरबूजाची लागवड केली आहे, ज्यातून ते लाखो रुपये कमावत आहेत.
सुरवातीला केळीची शेती शेतकरी चंद्रशेखर उपाध्याय यांनी आपल्या यशाविषयीं माहिती देतांना सांगितले की, जिल्ह्याच्या फलोत्पादन विभागाच्या अनुदानावर त्यांनी भाजीपाला आणि फळबागायतीची सुरुवात केली.
यामध्ये त्यांनी केळीची बाग लावली. त्यानंतर केळीच्या शेतीतून त्यांना भरपूर नफा मिळाला. मग उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने आणि चांगला नफा मिळविण्याच्या प्रेरणेने या प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या शेतात टरबूज आणि खरबूजाची लागवड करण्याचा विचार केला.
किती कमवतोय हा अवलिया सध्या शेती व्यवसायातून चांगला मोठा नफा मिळावा म्हणुन या प्रयोगशिल शेतकऱ्याने आपल्या शेतात सुमारे 8 बिघा जमिनीवर तैवान जातीच्या टरबूज आणि खरबूजाची लागवड केली आहे.
विशेष म्हणजे या शेतकऱ्याने केलेला हा बदल यशस्वी झाला असून त्याने सुमारे या शेतीतुन 2 लाख रुपये कमावले आहेत. हा अवलिया शेतकरी सांगतो की, त्यांना शेतीमध्ये खूप नुकसान सहन करावे लागले होते, पण त्यांनी हिंमत हारली नाही आणि पुढे जाण्याची जिद्द आणि ध्यास कायम ठेवला आणि यामुळे ते आज एक यशस्वी शेतकरी बनले आहेत.
निश्चितच चंद्रशेखर उपाध्याय यांनी केलेला शेतीतला हा बदल इतर शेतकऱ्यांना देखील शेती व्यवसायात चांगली कमाई करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.