भारत हा कृषीप्रधान देश आहे देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतकरी बांधवांच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचे तसेच देशाचे सर्व भवितव्य अवलंबून असते.
शेतकरी मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे काही पारंपरिक पिकांची लागवड झालेला खर्च देखील काढून देत नाही मात्र काही पिकांची लागवड खर्चाच्या दुप्पट नफा देणारी अशी असते.
उत्तर प्रदेश राज्यातील संभल येथे राहणारा कुलदीप सिंग देखील अशा पिकाची लागवड करतो ज्यामध्ये खर्चाचा दुप्पट त्याला नफा मिळत आहे.
कुलदीप गेल्या 22 वर्षांपासून स्ट्रॉबेरीची शेती करत आहे. कुलदीप हिवाळ्यात लावल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या जातीची शेती करत आहे.
वर्षाला ते 6 एकर शेतजमिनीत याची लागवड करतात. कुलदीप सांगतात की, तो 1997 मध्ये 12वी उत्तीर्ण झाला होता. त्यांचे वडील शिक्षक होते म्हणून त्यांना नोकरीनिमित्त बाहेर रहावे लागतं असे, त्यामुळे कुलदीपला घर व शेती सांभाळावी लागत असे. यामुळे मास्तराचा पोरगा कुलदीपला पुढील शिक्षण घेता आले नाही.
एका एकरसाठी जवळपास 6 लाखांचा खर्च कुलदीप सांगतात की, स्ट्रॉबेरीची लागवड सप्टेंबरमध्ये केली जाते जी मार्चपर्यंत चालते. शेतकरी मित्रांनो जर आपणास स्ट्रॉबेरीची एका एकरात लागवड करायची असेल तर यासाठी सुमारे 6 लाख रुपये खर्च आहे.
या हंगामात कुलदीप यांनी 6 एकरात स्ट्राबेरी लागवड केली अर्थात त्यांना सुमारे 36 लाखांचा खर्च याकामी आला मात्र खर्चाच्या दुप्पट कमाइ देखील त्यांना झाली आहे. स्ट्राबेरी शेतीतुन वर्षाकाठी कुलदीप यांना 30 लाखांची कमाई होते. कुलदीप पूर्वी पारंपरिक शेती करत त्यांच्या वडिलोपार्जित शेतीत भात-गहू हे पिके प्रामुख्याने घेतले जात होते.
मात्र सुरवातीला स्ट्रॉबेरी लागवडीची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी फक्त एका एकरात याची लागवड केली. त्यातून त्यांना चांगला नफा झाला. यामुळे त्यांनी आता प्रत्येक हंगामात 5 ते 6 एकर जमिनीत लागवड करण्यास सुरुवात केली.
कमाईसोबतच या शेतीत जोखीम देखील स्ट्राबेरीच्या शेतीत कमाईसोबतच जोखीमही असल्याचे कुलदीप सांगतात. या शेतीत नफा मिळतो कां तोटा सहन करावा लागतो हे सर्वस्वी हवामानावर अवलंबून असते. या पिकाला तापमानाचा खूप अधिक परिणाम होतो. कधी कधी गारपीट, थंडी किंवा अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक खराब होते. कुलदीप यांना देखील सलग दोन वर्षे नुकसान सहन करावे लागले, हवामान बदलामुळे संपूर्ण पिकाची नासाडी झाली.
बाजारात मागणी खूप अधिक आहे बाजारात स्ट्राबेरीची मागणी पुरेशी असल्याचे कुलदीप सांगतात. आता सुपर मॉल-मार्केटचे युग आहे, पण त्यात अडचण अशी आहे की ते फार काळ टिकत नाही. स्ट्रॉबेरीचे आयुष्य फक्त 2 ते 3 दिवस असते. त्यानंतर ते खराब होऊ लागते.
कुलदीप त्यांनी उत्पादीत केलेली स्ट्राबेरी त्यांच्या जवळच्या बाजारातच पाठवतात. विशेष म्हणजे स्ट्राबेरी विकताना त्यांना कधीही अडचण आली नाही. दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांमध्ये त्याची मागणी जास्त आहे. कारण, तिथे राहणारे लोक ते जास्त खातात.