Successful Farmer: शेतीमध्ये (Farming) काळाच्या ओघात बदल केल्याने काय होऊ शकते याचे उदाहरण उत्तर प्रदेश राज्यातून (Uttar Pradesh) समोर येतं आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये बदल करणे अतिशय महत्वाचे आहे.
कृषी वैज्ञानिक (Agricultural Scientist) देखील शेतकऱ्यांना शेतीमध्ये बदल करण्याचा सल्ला देत असतात. जाणकार लोक शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करण्याचे आवाहन वारंवार करत असतात.
तज्ञाच्या मते, शेतकऱ्यांनी बाजारात जे अधिक विकले जाते त्या पिकांची लागवड करावी जेणेकरून त्यांना यातून चांगले उत्पन्न मिळवता येणे शक्य होऊ शकते.
उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात सुमारे 3 लाख शेतकरी आहेत. यातील बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. बदलत्या काळानुसार काही शेतकरी बदल करत आहेत आणि आधुनिक पद्धतीने शेती करून लाखोंची कमाई करत आहेत.
असाच एक शेतकरी आहे विमल कुमार, जो की आधुनिक पद्धतीने खरबुज शेती (Melon Farming) करत आहे आणि यातून चांगली कमाई देखील करत आहे.
विमल कुमार सांगतात की, ते दरवर्षी एका एकरात खरबुजची लागवड करत असतात आणि त्यातून चांगले उत्पन्न कमावत आहेत. विमलने सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात त्यांचा खरबूज बाजारात जाऊ शकला नाही.
त्या काळात बरेच नुकसान झाले होते, पण आता लॉकडाऊन नाही. मंडई खुल्या आहेत, त्यामुळे चांगला भाव मिळत आहे. या वेळी चांगली कमाई होईल आणि प्रत्येक वेळेपेक्षा नफा जास्त होईल, अशी त्यांना आशा आहे.
विमल कुमार यांनी सांगितले की, खरबुजाचे पीक तयार करण्यासाठी सर्वप्रथम शेताची योग्य मशागत होणे महत्वाचे आहे. मशागत केल्यानंतर सेंद्रिय खतांचा वापर केला जातो आणि मग संपूर्ण शेतात मल्चिंग बेड बनवून लागवड केली जाते.
यावेळी बियाणे चांगले मिळाले असल्याने चांगले उत्पादन त्यांना मिळतं आहे. त्यांना प्रत्येक रोपातून 3 किलोपेक्षा जास्त उत्पादन मिळतं आहे.
विमल यांनी सांगितले की, 1 एकर लागवडीसाठी सुमारे 50 हजार रुपये खर्च येतो, ज्यामध्ये खते, बियाणे आणि मल्चिंगचा खर्च समावेश आहे.
विमल यांनी सांगितले की, एका एकरात खरबूज लागवड करण्यासाठी सुमारे साडे सहा हजार रोपांची आवश्यकता भासते. यामध्ये पाचशेच्या आसपास रोपांची नासाडी होत असते.
मात्र 6 हजार खरबूज रोपंतून चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य होते. विमल यांच्या मते, एका एकरात 18 टन खरबूज उत्पादन मिळवले जाऊ शकते.
विमल यांच्या मते सध्या बाजारात खरबूजला सुमारे 25 रुपये किलो दर मिळतं असून त्यांना यातून साडेचार लाख रुपये उत्पन्न मिळण्याची आशा आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की मागील वर्षी देखील विमल यांना खरबूज या पिकातून चार लाखांचा नफा मिळाला होता. विमल सांगतात की, मल्चिंग बेडने खरबूज शेती करण्याचे अनेक फायदे आहेत.
मल्चिंग बेडद्वारे शेती केल्यास पिकाला कमी पाणी लागते. ओलावा बराच काळ टिकून राहतो, ज्यामुळे उत्पादन वाढते. यासोबतच मल्चिंग बेड्समुळे तणांची समस्या संपते.
त्यामुळेच शेतकरी मल्चिंग बेडचा वापर करून अधिक उत्पादन घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. निश्चितच एका एकरात चार लाखांचे उत्पन्न मिळवून विमल यांनी इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श रोवला आहे.