Successful Farmer: आतापर्यंत आपण साऱ्यांनी कमळ (Lotus) चिखलात फुलत हे ऐकलं असेल आणि बघितलं ही असेल मात्र योग्य नियोजन केलं आणि अपार कष्ट केले तर हे चिखलात फुलणार कमल खडकाळ जमिनीत देखील फुलवलं जाऊ शकतं.
नुसतं फुलवलं जाऊ शकत नाही तर खडकाळ जमिनीत कमळ लाखो रुपयांचे उत्पन्न देखील मिळवून देऊ शकत. याचं एक उत्तम उदाहरण समोर आल आहे ते बुलढाणा जिल्ह्यातून.
बुलढाणा येथील कमलेश देशमुख आणि शेलगाव जहागीर येथील भागवत ठेंग या साल्या-मेव्हण्याच्या जोडीने खडकाळ जमिनीवर कमळाची बाग फुलवून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. विशेष म्हणजे खडकाळ जमिनीवर कमळची बाग फक्त फुलवलीच नसून तर त्यापासून लाखो रुपयांचे उत्पन्न कमावण्याची किमाया देखील या साला-मेव्हण्याच्या जोडीने साधली आहे.
मित्रांनो कोरोना दरम्यान लॉकडाऊनं असल्याने देशातील अनेक नवयुवकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. कमलेश देशमुख हे देखील अशाच तरुणांपैकी एक. कमलेश यांची कोरोना काळात नोकरी गेल्यामुळे ते आपल्या गावी परतले आणि त्यांनी आपल्या साल्याला जोडीला घेत शेती करण्याचा निर्णय घेतला.
या अनुषंगाने त्यांनी आपल्या साल्याच्या मात्र दहा गुंठे खडकाळ शेतजमिनीत कमळ फुलवण्याचा विचार केला. त्या अनुषंगाने त्यांनी कमळाची शेती (Lotus Farming) सुरू केली. कमलेश यांना अगदी लहानपणापासून फुलांची मोठी आवड. अन त्यातच कोरोना काळात कमलेश यांची नोकरी हिरावली गेली.
मग काय कमलेश यांनी आपल्या आवडीलाच उत्पन्नाचे साधन बनवण्याचे ठरवले. सुरुवातीला कमलेश यांनी आपल्या घराच्या छतावर कमळ शेती सुरू केली.
छतावर सुरू केलेली शेती कमलेश यांना चांगली फायदेशीर ठरली आणि मग आपल्या साल्याला सोबत घेत त्याच्या दहा गुंठे खडकाळ शेत जमीनमध्ये कमल शेती करण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने शेत जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आणि कमळची लागवड केली गेली.
खरं पाहता कमलेश आपल्या परसबागेत कमल शेती करत असल्याने त्यांना कमळ शेतीचे थोडेफार ज्ञान अवगत होते शिवाय फुलांची आवड असल्याने त्यांना फुलशेतीत विशेष रुची होती.
मात्र जेव्हा त्यांनी 10 गुंठे शेतजमिनीत कमळ शेती सुरू केली त्यावेळी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला आणि आपल्या ज्ञानात भर पाडली. सोशल मीडियाचा वापर करून कमळ शेतीचे सर्वे बारकावे जाणून घेतले.
आज कमलेश यांच्याकडे कमळाच्या 100 हून अधिक प्रजाती आहेत. ज्या खडकाळ जमिनीत एक छदाम देखील उत्पन्न मिळत नव्हते त्या खडकाळ जमिनीत कमलेशने कमळ फुलवुन लाखो रुपयांची कमाई केली आहे.
सोशल मीडियाचा वापर कमलेश यांनी आपले ज्ञान वाढवण्यासाठी केला तसेच याचाच वापर करून कमळ रोपांची विक्री देखील सुरू केली. आजच्या घडीला कमलेश आपल्या साल्यासमवेत लाखो रुपयांचे उत्पन्न कमवीत आहेत.
कमळ व्यतिरिक्त या साल्या-मेव्हण्याच्या जोडीने वॉटर लिलीची देखील लागवड सुरू केली आहे. सध्या ही कमलेश आणि त्याचे शालक कमळ आणि वॉटर लीली शेतीतून लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. निश्चितच या जोडीची ही भन्नाट कामगिरी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारी सिद्ध होणार आहे.