Success Story : शेतात नवनवीन प्रयोग करणे व त्यातून शेतीचे उत्पादन वाढविणे हे जरी शेतकऱ्याच्या हातात असले तरी शेतकऱ्याच्या हाती बाजार भाव नसल्यामुळे बाजारपेठेचा अंदाज शेतकऱ्याने लावणी गरजेचे असते.
ज्या त्या हंगामात वातावरणानुसार पिकांची मागणी असते. तर अशी पिके लागवड करून देखील लाखोंचा नफा मिळवता येऊ शकतो. आणि पिकाच्या उत्पादनासाठी
हंगामास पोषक असावा असे नसते तर वातावरण त्या पिकास अनुकूल करूनही उत्पादन वाढीचे प्रयत्न केले जाऊ शकतात.
याचा प्रत्यय म्हणून उन्हाळी बाजारपेठेचा अंदाज लावून कळंब तालुक्यातील एका तरुणाने थंडीमध्ये एका एकरात कलिंगडाची लागवड केली. तर त्याच्या प्रयोगाचे अनुकरण खडकीचे विजयकुमार राखुंडे यांनी यशस्वी केला आहे.
कलिंगड लागवड केल्यापासून कलिंगडाचे पीक अडीच महिन्यात पदरात पडते तर पिकाचे योग्य नियोजन केल्यास उत्पादनही भरघोस मिळते.राखुंडे यांनी डिसेंबरच्या शेवटी एका एकरात कलिंगडामधून 80 दिवसांमध्ये 4 लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे.
राखुंडे यांनी शुगर क्विन या वाणाच्या कलिंगडाची लागवड केली तर लागवडीसाठी त्यांनी दोन्ही रोपांमध्ये 6 फुटाचे अंतर सोडून सरी पद्धतीने लागवड केली व संपूर्ण शेत मलचिंग ने अच्छादन करून घेतले.
त्याचा फायदा शेतात तण मुक्त व पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत झाली. तर पाण्याच्या बचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करून पाणी देण्याची सोय केली.
उन्हाळ्याच्या तोंडावर माल विक्रीला यावा या दृष्टीने विजयकुमार आणि त्यांचे बंधु राजकुमार यांनी नियोजन केले होते. सर्वकाही वेळेत होत गेले आणि आता कलिंगडला मागणीही चांगली आहे.
त्याना कलिंगडाचे 42 टनापैकी 34 टन कलिंगडाची विक्री ही बांधावर झाली आहे. कलिंगडचा चांगला दर्जा असल्यामुळे व्यापाऱ्यांनी 14 रुपये किलोप्रमाणे खरेदी केली आहे. यामधून राखुंडे बंधु यांना 5 लाख 40 हजाराचे उत्पन्न पदरी पडले आहे. शिवाय 1 लाख खर्च वजा होता 4 लाखाचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे.