एका रात्रीत झालं वाटोळं, 40 कोटीची कंपनी बनली दिवाळखोर; पण 3 मित्रांनी असं काही केलं की उभी केली 400 कोटींची कंपनी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story : असं म्हणतात की हार के आगे जीत है ! आपणही नेहमीच अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणत असतो. मात्र जेव्हा अपयश येते तेव्हा ते अपयश पचवणे प्रत्येकालाच शक्य नसते. पण इंदूरमधील तीन मुलांनी अपयशातून यशाचे धडे गिरवले आहेत. या 3 युवकांनी माडीची काडी झाल्यानंतर पुन्हा एकदा काडीची माडी तयार केली आहे. यामुळे या तीन युवकांची ही कहाणी खऱ्या अर्थाने यश कशाला म्हणतात हे अधोरेखित करत आहे.

विनय सिंगल, प्रवीण सिंगल आणि शशांक वैष्णव यांची ही कहाणी आहे. विनय आणि प्रवीण हरियाणा राज्यातील भिवाणी येथील रहिवासी आहेत तर शशांक मध्य प्रदेश मधील इंदूर जवळचा आहे. या तीन मित्रांनी प्रचंड मेहनत घेऊन 40 कोटींची कंपनी उभी केली होती. ज्यावेळी त्यांची कंपनी 40 कोटींची बनली त्यावेळी त्यांना आपण सर्व साध्य केलं असं वाटत होतं.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आता आपल आयुष्य सेट आहे, कशाचीच चिंता करण्याचे कारण नाही असे त्यांना वाटू लागले. मात्र नियतीला काही औरच मान्य होतं. एका रात्रीतच या तिघा मित्रांनी बहु कष्टाने उभी केलेली चाळीस कोटींची कंपनी दिवाळखोरीत गेली. यामुळे हे तिन्ही मित्र जिथून सुरुवात झाली होती तिथेच पोहोचले. अर्श से फर्श पर म्हणतात ना तसच काहीस या तिघांसोबत झालं. मात्र त्यांनी हार मानली नाही.

परिस्थिती निश्चितच गंभीर होती पण त्यापेक्षा त्यांच्या मनात असलेली यशाची भूक ही अधिक खंबीर होती. मोठे अपयश आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपला व्यवसाय नव्या जोमाने आधीपेक्षा दुपट्ट ताकतीने उभा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिघांनी प्रचंड मेहनत घेतली. आणि आजच्या घडीला त्यांचा व्यवसाय 400 कोटींचा टप्पा पार करून मोठ्या थाटात उभा आहे.

म्हणजेच व्यवसायात त्यांनी तब्बल 10 पटीने ग्रोथ केली आहे. यामुळे सध्या या तिघा मित्रांची जोरदार चर्चा सुरू आहे. खरंतर हे तिघेजण सोशल मीडियावर व्हायरल कंटेंट तयार करतात. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून वायरल कन्टेन्ट लोकांपर्यंत पोहोचवतात आणि यातूनच त्यांना कमाई होते. या तिघांनी कॉलेज उत्तीर्ण झाल्याबरोबर व्हायरल कंटेंट साठी नवीन व्यासपीठ बनवण्याचे ठरवले.

हे त्यांनी पाहिलेले पहिले स्वप्न होते. यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी विटीफीड WittyFeed नावाचे वायरल कंटेंट साठीचे व्यासपीठ तयार केले. त्यांची ही कंपनी अवघ्या काही वर्षातच 40 कोटींची बनली. कंपनी ग्लोबली हिट झाली. त्यांच्या कंपनीची अनेक ठिकाणी कार्यालय उघडण्यात आली. या तिघांना कंपनीतून 40 कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. मात्र 25 नोव्हेंबर 2018 ला फेसबुक ने त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे पेज ब्लॉक केले आणि क्षणार्धात त्यांची कंपनी गायब झाली.

कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळवून देणारी ही कंपनी अवघ्या एका रात्रीतच कोणालाच दिसेनासी झाली. हे तिघे खूप निराश झाले. कोट्यावधींचा व्यवसाय पाण्यात बुडाला म्हणून ते प्रचंड दुःखी झालेत. मात्र त्यांनी हार मानली नाही. आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे हित जोपासले आणि त्यांना तीन महिन्याचा पगार दिला.  यानंतर त्यांना काही महिन्यांनी स्टेज या कंपनीची कल्पना सुचली. यासाठी त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या मालकावर विश्वास दाखवला आणि इथूनच सुरू झाला एक नवीन अध्याय. असा एक नवीन अध्याय जो 40 कोटींवरून थेट 400 कोटींवर पोहोचला. नोव्हेंबर 2019 मध्ये विनयने त्याच्या दोन सहकाऱ्यांसोबत स्टेज STAGE ॲप लॉन्च केले. एप्लीकेशन लॉन्च केल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच एप्लीकेशन हिट ठरले. पुन्हा एकदा त्यांच्या कंपनीने उभारी घेतली.

आज त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन 300 कोटींच्या घरात आहे. खरंतर 2019 मध्ये ओटीटीचे युग सुरू झाले. मात्र हरियाणवी भाषेतील कंटेंट ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यावेळी दिसत नव्हते. आणि येथूनच मग खऱ्या अर्थाने त्यांना स्टेजची कल्पना सुचली. विनय आणि त्याच्या सहकाऱ्यांनी स्थानिक बोली भाषांमध्ये वेब सिरीज बनवण्यास सुरुवात केली.

एप्लीकेशनच्या माध्यमातून स्थानिक बोली भाषांमध्ये कंटेंट तयार करून लोकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली. विनय सांगतात की स्टेज हे देशातील पहिले स्थानिक बोलीभाषावाले ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मला हरियाणाचे पहिले नेटफ्लिक्स असेही म्हटले जाते.

निश्चितच, या तिघा मित्रांची ही यशोगाथा तरुणांसाठी खूपच प्रेरणादायी ठरणार आहे. जेव्हा एखादे मोठे अपयश आपल्या आयुष्यात येते तेव्हा ते अपयश आपल्यासोबत यशाच्या अनेक चाव्या घेऊन हजर होते हेच या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.