देशातील अनेक नवयुवक शेतकरी पुत्र (Farmer) नोकरी किंवा उद्योगधंद्याच्या निमित्ताने आपल्या गावाकडून मोठ्या प्रमाणात शहरात स्थलांतर करत असतात.
गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये (Farming) नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी पुत्र आता शेतीकडे पाठ फिरवित आहेत. शेतीऐवजी शेतकरी पुत्रांना आता नोकरीत अधिक रस वाटू लागला आहे.
अशा वेळी तुम्हाला जर आम्ही सांगितले की, एक अवलिया नोकरी सोडून शेतीकडे परतला आहे तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.
मात्र, मध्यप्रदेश (Madhya Pradesh) मध्ये असा एक अवलिया आहे जो नोकरी सोडून सध्या शेती करीत आहे. विशेष म्हणजे शेतीमधून तो लाखो रुपयांचे उत्पन्न देखील प्राप्त करीत आहे.
त्याने आपल्या ज्ञानाचा वापर शेतीमध्ये करून सेंद्रिय पद्धतीने (Organic Farming) उत्पादित केलेल्या भाजीपाल्याच्या विक्रीसाठी त्याने व्हॉट्सअॅपचा (Whatsapp) आधार घेतला.
मध्य प्रदेश राज्यातील बुरहानपूर येथील मौजे आबाडाचे रहिवासी गोपाल सिंग राठौर यशस्वी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यादीत सामील झाले आहेत.
आजकाल सेंद्रिय, झिरो बजेट फार्मिंग, नैसर्गिक किंवा रसायनमुक्त शेतीची खूप चर्चा आहे. यात मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे श्रेय निश्चितच गोपाल सिंग सारख्या सुशिक्षित शेतकऱ्यांना दिले पाहिजे.
व्हाट्सअँप चा असा हा उपयोग गोपाळ राठोड सांगतात की, त्यांच्या शेतात सेंद्रिय पद्धतीने उत्पादित झालेला रसायनमुक्त भाजीपाला एक आठवडाभर टिकू शकतो. म्हणुन तो अशा भाज्यांचे पॅकेज बनवतो आणि त्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अपडेट करतो.
व्हाट्सअँप ग्रुपवर त्याला भाजीपाल्याच्या ऑर्डर मिळतात आणि ऑर्डर थेट लोकांच्या घरी होम डिलिव्हरी केली जाते. राठोड यांच्या मते, त्यांना 1 एकर शेतजमिनीत एक लाख रुपये खर्च येतो आणि नफा 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत होतं असतो.
नोकरीला राम दिला अन शेतीला सुरवात केली खरं पाहता राठोड यांनी वाणिज्य अर्थात कॉमर्स शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. यशस्वीरित्या शिक्षण पूर्ण केल्यानंतर गोपाल आपल्या महाराष्ट्रातील एका खासगी कृषी महाविद्यालयात काम करू लागला.
नोकरीच्या काळात गोपाल कृषी महाविद्यालयातील शेतीचे सर्व प्रकल्प जवळून पाहत असे, त्यानंतर त्यांची उत्सुकता आणि आवड शेतीकडे वाढत गेली.
मग मात्र गोपालचे नोकरीत काही मन रमेना त्याला शेती करण्याची आवड महाराष्ट्रात स्वस्त बसू देत नव्हती. अखेर मग गोपाळने नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला.
सेंद्रिय शेतीची कल्पना कशी मिळाली गोपाल सुरुवातीला रासायनिक शेती करायचे. त्यामुळेच रासायनिक खते आणि रासायनिक कीटकनाशकांचा प्रचंड वापर झाला.
पण त्यांच्या शेतीत एक नवीनपणा आला जेव्हा त्यांचा एक नातेवाईक आजारी पडला आणि त्यांना मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
तेथील डॉक्टरांनी सांगितले की, त्याच्या नातेवाईकाला कॅन्सरसारख्या घातक आजाराने ग्रासले आहे. यानंतर त्यांनी केमिकलयुक्त फळे आणि भाज्या पिकवणे बंद केले. येथून त्यांची सेंद्रिय शेती सुरू झाली ती आजतागायत अबाधित चालू आहे.
सेंद्रिय शेती गोपालसाठी ठरली फायदेशीर गोपाल राठोड यांनी सांगितले की, जेव्हा सेंद्रिय शेतीचे चांगले परिणाम मिळू लागले, तेव्हा त्यांचा उत्साह वाढत गेला.
सेंद्रिय उत्पादनांच्या किमतीही वाढल्या होत्या. त्यामुळे त्याने मागे वळून पाहिले नाही. वर्षानुवर्षे वेगवेगळी पिके रसायनमुक्त शेतीशी जोडली गेली.
आज ते एकूण 18 एकर जमिनीवर शिमला मिरची, टरबूज, खरबूज, टोमॅटो, लौकी, वांगी आणि केळी या पिकांची सेंद्रिय पद्धतीने शेती करीत आहेत.
अर्ध्या एकरात पॉलीहाऊस बांधले गोपाल राठोड सांगतात की, जेव्हा त्यांनी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली तेव्हा त्यांना पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी फारच कमी उत्पादन मिळाले. मात्र त्यानंतर उत्पादन वाढू लागले.
त्यानंतर त्यांनी उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून लोकांना जागरूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सेंद्रिय शेतीचे फायदे लोकांना कळू लागले.
त्याच्या उत्पादनांना चांगला भाव मिळू लागला. शेती हायटेक करण्यासाठी त्यांनी 12 लाख रुपये खर्चून अर्ध्या एकरात पॉलीहाऊस बांधले.
पॉलीहाऊस मध्ये किती उत्पादन झाले पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला लागवडीसाठी सूक्ष्म सिंचन ठिबक आणि आच्छादनाचा वापर करून सिमला मिरची बियाणे पेरले. सध्या त्यांच्या सिमला मिरचीच्या पिकाला 70 दिवस झाले असून यातून त्यांना 10 टन उत्पादन मिळाले आहे.
त्यांना सुमारे सहा महिन्यांच्या सिमला मिरची पिकातून 50 टन उत्पादन मिळेल. राठोड त्यांच्या पिकांचे अवशेष आणि कचरा इत्यादींचा वापर सेंद्रिय खत आणि कीटकनाशके तयार करण्यासाठी करतात. कंपोस्ट खत पिकांना दिल्यास त्यांची वाढ झपाट्याने होते.