Farmer succes story : शेतीमध्ये गेल्या अनेक दशकांपासून वारंवार वेगवेगळे संकटे उभी झाली आहेत. कधी अवकाळी,कधी अतिवृष्टी,कधी गारपीट,कधी ढगाळ वातावरण तर कधी शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे बळीराजा (Farmer) पुरता कोलमडला आहे.
याशिवाय मायबाप सरकारचे (Government) शेतीविषयक धोरण (Farming Policy) देखील शेतकऱ्यांना उबजारी येऊ देत नाही.
या सर्व नैसर्गिक तसेच सुलतानी दडपशाहीचा सामना करत बळीराजा मोठ्या शर्तीने शेती करण्याचे धाडस करीत आहे. बळीराजाचे हेच धाडस त्याला कधीकधी फायदेशीर ठरते.
याचेचं एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते नाशिक मधील देवळा तालुक्यात. तालुक्यातील मौजे खामखेडा येथील एका प्रगतीशील शेतकऱ्याने पारंपरिक पीक पद्धतीला बगल दाखवत टरबुज पिकाची शेती (Watermelon Farming) करून मात्र अडीच महिन्यात दहा लाखांचे भरघोस उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे.
खरं पाहता मौजे खामखेडा येथील शेतकरी बागायती शेती करतात. खामखेडा व आजूबाजूच्या परिसरात मका व कांदा या नगदी पिकांची तसेच भाजीपाला वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात.
मात्र खामखेडा येथील विशाल बच्छाव यांनी शेतीमध्ये एक नावीन्यपूर्ण बदल करत परिसरात घेतल्या जाणाऱ्या पिकांऐवजी टरबूज या हंगामी पिकांची शेती करण्याचा निर्णय घेतला.
या अनुषंगाने विशाल यांनी आपल्या वडिलोपार्जित तीन एकर शेतजमिनी सोडून वाट्याने चार एकर शेतजमीन कसायला घेऊन टरबूज पिकांची शेती सुरु केली.
या चार एकर क्षेत्रात अवघ्या अडीच महिन्यात 100 टनांहून अधिक टरबूजचे उत्पादन त्यांनी घेतले. आपल्या वडिलोपार्जित 3 एकर शेतीसह त्यांनी चुलत्याची 4 एकर शेतजमीन कसायला घेतली आहे.
खरं पाहता विशाल यांनी यावर्षी पहिल्यांदाच टरबुजाचे पीक घेतले असे नाही तर गेल्या तीन वर्षापासून विशाल टरबूज आणि भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करीत आले आहेत.
मात्र गत दोन वर्ष कोरोनामुळे त्यांना टरबूज पिकात उन्नतीचे कवडीमोल उत्पन्न मिळाले. तरीही न खचता विशाल यांनी मोठ्या जिद्दीने याहीवर्षी टरबुजाची शेती केली.
टरबूज लागवड करण्यासाठी या वर्षी त्यांनी रोपांऐवजी बियाणे पेरले आणि मल्चिंग पेपर अंथरून ठिबक सिंचन प्रणालीचा यशस्वी वापर करून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले.
पाणी आणि खत व्यवस्थापन अचूक केल्याने अवघ्या अडीच महिन्यात त्यांच्या पदरात दर्जेदार टरबुजाचे पीक पडले सध्या विचार यांच्या टरबुजाची हार्वेस्टिंग सुरु आहे.
आतापर्यंत विशाल यांनी 100 टन टन टरबूजची हार्वेस्टिंग केली असून अजून वेस्टन टरबूज उत्पादित होणार अशी त्यांची आशा आहे.
एवढेच नाही तर दुसऱ्या तोड्याचा माल देखील दहा टनापर्यंत पोचू शकतो असा त्यांचा अंदाज आहे. विशाल यांचे सर्व टरबूज बागलान येथील एका व्यापार्याच्या मदतीने जम्मू-काश्मीरच्या बाजारपेठेत पाठवले आहेत.
निश्चितच विशाल यांनी चार एकर क्षेत्रात अवघ्या अडीच महिन्यात दहा लाखांचे उत्पन्न घेऊन इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श रोवला आहे.
विशाल यांनी दाखवून दिले की, प्रतिकूल परिस्थितीत देखील जिद्दीने आणि योग्य नियोजन करून अनुकूल वातावरण तयार करता येते आणि शेती व्यवसायातून देखील लाखों रुपयांचे उत्पन्न सहज मिळवता येते.