सध्या देशातील तसेच आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) पारंपारिक पीक पद्धतीला (Traditional crop) बगल देत नवीन नगदी पिकांची तसेच बाजारात कायम मागणी असलेल्या पिकांची लागवड करीत आहेत.
अनेक शेतकरी बांधव फळबाग तसेच फुलशेतीकडे (Floriculture) वळले आहेत. फुलशेती अल्प कालावधीत अधिक पैसा मिळवून देत असल्याने शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात फुल शेती करू लागले आहेत.
पुणे जिल्ह्यातील (Pune District) पुरंदर तालुक्याच्या मौजे वाघापूर येथील नितेश कुंजीर व कुटुंबीयांनी देखील 2013 मध्ये शेतीत काहीतरी हटके करायच या विचाराने कार्नेशन फुलांची लागवड (Cultivation of carnation flowers) केली.
या अनुषंगाने त्यांनी दहा गुंठे क्षेत्रात कार्नेशन लागवडीचा (Carnation Farming) प्लॅन आखला. कार्नेशन साठी आवश्यक रोपे बेंगलोर तसेच हवेली तालुक्यातुन मागवली गेली. दहा गुंठ्यात कार्नेशनची बाग फुलवण्यासाठी त्यांना तब्बल 18 लाखांचा खर्च आला.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की कार्नेशन लागवड केल्यानंतर जवळपास 105 दिवसांनी याचे उत्पादन यायला सुरुवात होते.
लग्नसराईत या फुलाला विशेष डिमांड असते म्हणून लग्नसराई डोळ्यासमोर ठेवूनच या फुलांची लागवड केली तर अधिक फायदा मिळतो.
कार्नेशन च्या साधारण वीस फुलांची एक गलती केली जाते आणि या गड्डीला 30 ते 300 रुपये प्रति गड्डी असा दर मिळतो. एकंदरीत कार्नेशनला दर्जानुसार आणि हंगामानुसार भाव मिळत असतो.
दहा गुंठे क्षेत्रात कार्नेशनची एकूण 10 हजार रोपे लावली जातात. कुंजीर कुटुंबीयांनी देखील सुमारे दहा हजार रोपांची लागवड केली आहे.
कार्नेशनच्या शेतीतून वर्षाकाठी आठ ते नऊ लाखांची कमाई होत असल्याचा कुंजीर कुटुंबियांनी दावा केला आहे. कार्नेशन फुल लाल,पांढरे,पिवळे, गुलाबी असते. 2013 मध्ये कुंजीर कुटुंबीयांनी शेती करण्यास सुरुवात केली तेव्हा या फुलशेतीसाठी शासनाकडून अनुदान दिले जात होते सद्यस्थितीला मात्र शासनाने हे अनुदान बंद केले आहे.
नोटा बंदीच्या काळात तसेच कोरोणाच्या काळात नितेश कुंजीर यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. कोरोना मध्ये कार्नेशन फुलांची विक्री नितेश यांना करता आली नाही त्यामुळे त्यांना लाखों रुपयांचा फटका बसला.
मात्र विपरीत परिस्थितीत जो जिद्दीने लढत असतो तो नक्कीच यशस्वी होतो. या पद्धतीने नितेश देखील कार्नेशन फुलशेती करीत यशाचे नवे शिखर सर करीत आहे.
सध्या कार्नेशन फुलाला चांगला दर मिळत असल्याचे नितेश यांनी सांगितले असून त्यांना यातून चांगले उत्पन्न मिळण्याची देखील आशा आहे. एकंदरीत नितेश यांनी केलेला हा हटके आणि नावीन्यपूर्ण प्रयोग फळास आला आहे.