राज्यातील अनेक प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कापूस लागवड होऊन सव्वा महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. काही ठिकाणी कापसाचे पीक एका महिन्याचे झाले आहे. तर काही ठिकाणी हे पीक 45 ते 50 दिवसांचे आहे. अशा या परिस्थितीत कापूस पिकात फुटव्यांची संख्या वाढली पाहिजे यासाठी फवारणी घेणे आवश्यक असते.
तसेच या काळात कापसाच्या पिकावर मावा, तुडतुडे, फुल किडे, पांढरी माशी अशा विविध रस शोषक किडींचा प्रादुर्भाव देखील पाहायला मिळतो. या किडीचा प्रादुर्भाव जर योग्य वेळी नियंत्रणात आणला गेला नाही तर पिकाचे मोठे नुकसान होते. यामुळे या कीटकांवर नियंत्रण मिळवणे देखील आवश्यक असते.
एवढेच नाही तर सध्या अनेक प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. याशिवाय काही ठिकाणी पावसाचे सत्र सुरू आहे. यामुळे आता कापूस पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे फुटवे फुटण्यासाठी, किटकांचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहावा यासाठी कापसावर फवारणी करावी लागणार आहे.
कापसाच्या पिकात पहिली फवारणी झाली आहे. आता पिकात दुसरी फवारणी घ्यावी लागणार आहे. कापूस लागवडीनंतर सरासरी 45 ते 60 दिवसांत दुसरी फवारणी घ्यावी लागणार आहे. दरम्यान आता आपण कापूस पिकात दुसरी फवारणी कोणत्या औषधांची घ्यावी ? याबाबत माहिती पाहणार आहोत.
या औषधांची फवारणी करा
यूपीएल कंपनीचे उलाला किंवा लॅन्सरगोल्ड यापैकी कोणतेही एक कीटकनाशक + युपीएल चे SAAF हे बुरशीनाशक + बायोविटाएक्स टॉनिक किंवा 12 : 61 : 00 यां विद्राव्य खताची फवारणी करायची आहे.
प्रमाण किती असावे ?
उलाला हे कीटकनाशक वापरणार असाल तर प्रति 15 लिटर पंपासाठी आठ ग्रॅम आणि जर लॅन्सर गोल्ड हे कीटकनाशक वापरणार असाल तर प्रति 15 लिटर पंपांसाठी 25 ग्रॅम वापरले पाहिजे. साफ SAAF हे बुरशीनाशक 15 लिटर पंपासाठी 30 ग्रॅम या प्रमाणात घेतले जाऊ शकते. टॉनिक म्हणून बायोविटाएक्स प्रति 15 लिटर पंपासाठी 30 मिली या प्रमाणात घेतले जाऊ शकते. किंवा 12 : 61 : 00 हे विद्राव्य खत 15 लिटर पंपासाठी 75 ग्रॅम या प्रमाणात घेऊ शकतात.