Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रात पिकवले जाणारे एक महत्त्वाचे कॅश क्रॉप अर्थातच नगदी पीक. याची लागवड राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये केली जाते. हे एक प्रमुख तेलबिया पीक असून दरवर्षी विजयादशमीपासून सोयाबीनची आवक वाढत असते.
यंदाही आगामी काळात सोयाबीनची आवक वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आज आपण विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील प्रमुख बाजारांमध्ये सोयाबीनला काय दर मिळाला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारांमधील सोयाबीन बाजार भाव
लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती : मध्य महाराष्ट्रातील या बाजारात काल पांढऱ्या सोयाबीनला सर्वाधिक दर मिळाला आहे. या बाजारात सोयाबीनला किमान 351 कमाल 5151 आणि सरासरी 4470 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
जळकोट कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात सोयाबीनला किमान 4400, कमाल 4600 आणि सरासरी 4500 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचुर कृषी उत्पन्न बाजार समिती : मध्य महाराष्ट्रातील या एपीएमसी मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर झालेल्या लिलावात सोयाबीन ला किमान 3000, कमाल 4567 आणि सरासरी 4 हजार 400 असा भाव मिळाला आहे.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर झालेल्या लिलावात सोयाबीनला किमान चार हजार, कमाल 4500 आणि सरासरी 4250 असा भाव मिळाला आहे.
आष्टी जालना कृषी उत्पन्न बाजार समिती : विजयादशमीच्या मुहूर्तावर झालेल्या लिलावात या बाजारात सोयाबीनला किमान 3800, कमाल 4465 आणि सरासरी 4200 असा भाव मिळाला आहे.
पातुर कृषी उत्पन्न बाजार समिती : दसऱ्याच्या मुहूर्तावर झालेल्या लिलावात एपीएमसी मध्ये सोयाबीनला किमान 3600, कमाल 4450 आणि सरासरी 3915 असा भाव मिळाला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती : अहिल्या नगर जिल्ह्यातील राहता एपीएमसी मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर झालेल्या लिलावात सोयाबीनला किमान 3931, कमाल 4452 आणि सरासरी 4350 असा भाव मिळाला आहे.
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात सोयाबीनला 4450 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोयाबीनला हा दर मिळाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : अहिल्यानगर मधील या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला किमान 3800, कमाल 4400 आणि सरासरी 4100 असा भाव मिळाला आहे.