Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पिक आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीनचे बाजार भाव दबावात आहे. यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांना याचा मोठा फटका बसला आहे.
यंदाचा हंगाम हा विजयादशमीला सुरू झाला आणि तेव्हापासून बाजारात सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याचे वास्तव आहे. आता हंगाम जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन विक्री करून टाकले आहे.
बाजारभाव वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती मात्र दर वाढलेच नाहीत. अनेक ठिकाणी सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत होता. पण, पैशांची गरज भासल्याने अनेक शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागला आहे. आता फारच कमी शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे.
अशातच मात्र शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील एका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल 13000 चा भाव मिळाला आहे. विशेष म्हणजे सरासरी बाजार भाव देखील 12 हजाराहून अधिक मिळाला आहे.
कुठं मिळाला विक्रमी भाव
महाराष्ट्र राज्य पणन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल अर्थातच 4 मे 2024 ला या हंगामातील सर्वोच्च भाव मिळाला आहे.
या मार्केटमध्ये कालच्या लिलावात लोकल सोयाबीनला कमाल 13000 रुपयाचा भाव मिळाला असून किमान 11000 आणि सरासरी 12,500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. राज्यातील इतर बाजारांमध्ये मात्र सोयाबीनची भाव पातळी साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच पाहायला मिळाली.
राज्यातील इतर बाजारांमधील सोयाबीनचे दर
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4400, कमाल 4600 आणि सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान चार हजार 350, कमाल चार हजार पाचशे आणि सरासरी 4425 असा भाव मिळाला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4150, कमाल 4551 आणि सरासरी चार हजार 350 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.