Soybean Price : भारतात(India) या वर्षी सोयाबीनचा पेरा कमी झाला होता. त्यात पुन्हा अतिवृष्टीने जे सोयाबीन आले ते पाण्यात गेले. आता एवढ्या नैसर्गिक संकटातून सुटून जे सोयाबीन आले त्याला सोन्याचे भाव येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये सोयाबीनचे दर असे काय बदलले आहेत यावर शेतकऱ्यांचाच काय व्यापाऱ्यांचा देखील विश्वास बसत नव्हता.
मध्यंतरी शनिवारचे दर वगळता सोयाबीनच्या दरात वाढच होत आहे. मंगळवारी बाजार समितीमध्ये व्यवहार झाले नसले तरी प्रक्रिया उद्योगावरुन सोयाबीनचे दर हे चढेच राहणार असल्याचे चित्र आहे. (market committee )
भाव वाढण्यामागील खेळ समजून घ्या
युद्धामुळे अर्जेंटिना रशिया आणि युक्रेन(Argentina, Russia and Ukraine) येथून सुर्यफुलाचे (edible oil import) तेल आयात ठप्प झाली आहे. परिणामी तेलासाठी देशांतर्गत बाजारातील सोयाबीनची मागणी वाढली आहे(Soybean demand). अंतर्गत मागणीचा जास्त फायदा उठवण्यासाठी व्यापाऱ्यांनी सोयाबीनची खरेदी जोरात चालू केली आहे. याचाच परिणाम दरावरही होताना दिसत आहे.सध्या सोयाबीनला हंगामातील उच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात दरात वाढ होणार की घटणार यामुळे विक्रीबाबत शेतकरी हे संभ्रम अवस्थेत आहेत.
शेतकऱ्यांना होतोय फायदा
खरीप हंगामातील सोयाबीन जोमात असतानाच झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सोयाबीन हेच मुख्य पीक असल्याने झालेले नुकसान कसे भरुन काढावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतानाच हंगामाच्या सुरवातीला दरही कवडीमोल मिळाला होता. सरकारनेही लागणाऱ्या खाद्य तेलाची गरज भागवण्यासाठी देशांतर्गत सोयाबीनचे उत्पादन वाढवण्याची प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी सरकार दरवर्षी सोयाबीनच्या हमी भावात वाढ करत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट दर, पण विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांनी घ्यावा
हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना दर हे वाढलेले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे दर हे दुप्पट झाले आहेत. मात्र, सध्या अस्थिर दरामुळे आणि य़ुध्दजन्य परस्थितीचा अणखी किती परिणाम होणार यामुळे साठवणूक करावी का विक्री हा प्रश्न कायम आहे. पण 7 हजार 500 हा दर चांगला असून अधिकचे नुकसान न होऊ देता या दरात शेतकऱ्यांनी विक्रीलाच प्राधान्य देण्याचा सल्ला व्यापारी देत आहेत. मात्र तरुण शेतकऱ्यांनी आंतराष्ट्रीय घटनांचा आढावा घेऊन सोयाबीन साठवणुकीला पर्याय दिला पाहिजे असे काही शेती जाणकार सांगतात.