गुड न्युज ! ‘या’ कारणामुळे खाद्यतेलाच्या दरात झाली मोठी कपात, पण दिवाळीत खाद्यतेलाचे भाव वाढणार का ? तज्ञ सांगतात की…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Oil Rate : सध्या संपूर्ण देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाचा सण मोठ्या आनंदात साजरा झाला आहे. या चालू महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये नवरात्र उत्सव आणि विजयादशमीचा सण साजरा होणार आहे.

विजयादशमी साजरा झाली की लगेचच संपूर्ण देशभरात दिवाळीचा मोठा सण सेलिब्रेट केला जाणार आहे. दरम्यान या सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलाच्या किमतीत विक्रमी घट आली आहे. यामुळे सर्वसामान्यांचा सण गोड होत आहे.

मात्र असे असले तरी दिवाळीमध्ये देखील खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहतील की खाद्यतेलाच्या दरात वाढ होईल हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. म्हणून आज आपण या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरंतर, खाद्यतेलाचा भारतीय स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात वापर होतो. सणासुदीच्या काळामध्ये तेलाच्या वापरात मोठी वाढ होते. येत्या नवरात्र उत्सव, विजयादशमी आणि दिवाळीच्या सणाला देखील खाद्यतेलांचा वापर वाढणार आहे. वापर वाढला म्हणजेच बाजारभावात वाढ होणे अपेक्षित असते.

किंबहुना आतापर्यंत अनेकदा दिवाळीच्या काळात खाद्यतेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढच झाली आहे. यामुळे यंदा देखील दिवाळीच्या काळात खाद्यतेलाच्या किमती वाढतील का हा सवाल सर्वसामान्य गृहिणींच्या माध्यमातून विचारला जात आहे.

जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे सध्या स्थितीला देशात खाद्यतेलाच्या किमती शंभर रुपये ते 120 रुपये प्रति किलो या पातळीवर पाहायला मिळत आहेत. 15 लिटर तेलाचा डब्बा सरासरी 1400 ते 1500 रुपयाला मिळत आहे. सध्या सूर्यफूल तेलाचे भाव 105 ते 115 रुपये, सोयाबीन तेलाचे भाव शंभर ते 105 रुपये, सरकी 100 ते 102 रुपये, पामतेल 90 ते 95 रुपये प्रति किलो या भावात विकले जात आहे.

इंडोनेशिया व मलेशियामध्ये पामतेलाचे विक्रमी उत्पादन झाले असल्याने जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा वाढला आहे. हेच कारण आहे की सध्या स्थितीला देशांतर्गत खाद्यतेलाचे भाव कमी झाले आहेत. विशेष म्हणजे जोपर्यंत जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा वाढलेला राहील तोपर्यंत खाद्यतेलाचे भाव वाढणार नाहीत असे देखील तज्ञांनी सांगितले आहे.

तर काही तज्ञांनी यावर्षी दिवाळीत देखील खाद्यतेलाचे भाव वाढणार नाहीत असे सांगितले आहे. तज्ञांच्या मते, यंदा तेलबियांचे उत्पादन देशात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत आयात कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात तेलाच्या किमती कमी राहणार आहेत. दिवाळीत देखील यावर्षी भाव जैसे थे राहणार आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा