Soybean Farming : जुलै महिना सुरू झाला आहे. मात्र अजूनही राज्यातील बहुतांशी भागात पाऊस झालेला नाही. विशेषता मराठवाड्यात आणि विदर्भात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. मराठवाडा आणि विदर्भ हे दोन्ही विभाग सोयाबीन उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. याच विभागात कमी पाऊस झाला असल्याने अद्याप बहुतांशी शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केलेली नाही.
काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली आहे मात्र राज्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने पेरणी केलेले सोयाबीन संकटात आले आहे. मात्र आगामी काही तासात राज्यात जोरदार पाऊस होणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार चार जुलै नंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे चार जुलै नंतर राज्यात सोयाबीनच्या पेरणीला वेग येणार आहे. दरम्यान आज आपण सोयाबीन पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी कोणती खते वापरली पाहिजे त्याविषयी जाणून घेणार आहोत.
सोयाबीन पिकासाठी या खतांचा वापर करा
सोयाबीन पेरणी करताना शेतकरी बांधवांनी कोणती खते वापरली पाहिजे याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत. खरंतर सोयाबीन पीक हवेतील नत्र शोषून घेते. यामुळे या पिकाला नत्रयुक्त खतांचा पुरवठा फारसा करावा लागत नाही.
मात्र सोयाबीनला स्फुरद आणि गंधक या अन्नद्रव्याची गरज असते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयाबीन पीक हवेतील नत्र शोषून घेत असल्याने नत्रयुक्त खतांचा वापर शेतकऱ्यांनी कमी करावा.
पण शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करताना सिंगल सुपर फाँस्फेट 3 बँग युरीया आणि पोट्याश प्रत्येकी 20 किलो किंवा 20-20-00-13 दीड बँग (70kg) (यामध्ये सल्फर आसल्याने सल्फर वेगळे वापरन्याची गरज नाही) किंवा 10-26-26 दीड बँग (70kg) + सल्फर 10 किलो किंवा 14-35-14 दीड बँग (70kg) + सल्फर 10 किलो किंवा 12-32-16 दीड बँग (70kg) + सल्फर 10 किलो यापैकी कोणत्याही एका कॉम्बिनेशनचा उपयोग शेतकऱ्यांनी केला पाहिजे.