Soybean Farming Tips : सोयाबीन पिकाची (Soybean Crop) संपूर्ण भारत वर्षात शेती (Soybean Farming) केली जाते. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील विशेष उल्लेखनीय अशी लागवड केली जाते.
राज्यातील विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सोयाबीन पिकाची लागवड पाहायला मिळते. खरीप हंगामातील (Kharif Season) हे एक मुख्य पीक आहे. या पिकाच्या लागवडीवर अनेक शेतकरी बांधवांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून असते.
अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीन पिकात अंतिम टप्प्यात कोणते व्यवस्थापन (Soybean Crop Management) करणे अनिवार्य आहे याविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो या वर्षी सोयाबीनला हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. म्हणजे यावर्षी सोयाबीनला हमी भावापेक्षा अधिक बाजार भाव मिळणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सोयाबीन पिकासाठी केंद्र शासनाने 4300 रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव लावून दिला आहे.
अशा परिस्थितीत यंदा हमीभावापेक्षा तब्बल सातशे रुपयांपर्यंत अधिक बाजार भाव मिळणार आहे. निश्चितच गेल्या वर्षीपेक्षा कमी बाजार भाव यावर्षी मिळणार असल्याचा अंदाज असला तरीदेखील समाधान कारक बाजार भाव या वर्षी सोयाबीनला मिळणार आहे. मित्रांनो राज्यात जवळपास सर्वत्र सोयाबीन पिकात शेंगा भरायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन पिकाकडे आता बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकात वेगवेगळ्या किडींच्या नियंत्रणासाठी पक्षी थांबे उभारण्याची गरज आहे. शेतकरी बांधवांनी जवळपास नऊ ते दहा पक्षी थांबे सोयाबीन पिकात बसवले पाहिजे. तसेच जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 5 स्पोडोल्यूरचा वापर करून फेरोमन सापळे लावावेत. स्पोडोप्टेरा ही एक पाने खाणारी अळी आहे.
अशा परिस्थितीत पिकाच्या अंतिम टप्प्यात या कीटकांवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रातील तज्ञांच्या मते, नियंत्रणासाठी अंडी समूहांचा तसेच समूहाने आढळणाऱ्या अळ्यांचा वेळीच नायनाट केल्यास रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळता येतो. मात्र या उपाययोजना करून देखील कीटकावर बंदोबस्त मिळवता आला नाही तर रासायनिक कीडनाशकांचा वापर केला जाऊ शकतो.
रासायनिक पद्धतीने या कीटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी क्लोरपायरीफॉस (20 %) 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन (25%) 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. सध्या आर्द्रता युक्त वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे तांबेरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर पाहायला मिळू शकतो. याच्या नियंत्रणासाठी प्रोपीकोनॅझोल किंवा हेक्झाकोनॅझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.