शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सोयाबीनच्या 3 नवीन जाती विकसित, नव्याने विकसित झालेल्या सोयाबीन वाणाची विशेषता पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्रातील एक प्रमुख नगदी आणि खरीप हंगामात उत्पादित होणारे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. याची लागवड राज्यातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात केली जाते. म्हणजेच कोकण वगळता राज्यातील इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये या पिकाची कमी-अधिक प्रमाणात लागवड पाहायला मिळते.

एका आकडेवारीनुसार सोयाबीन उत्पादनाचा विचार केला असता महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेश राज्याचा सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत देशात पहिला क्रमांक लागतो.

मध्यप्रदेश मध्ये देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 45 टक्के एवढे उत्पादन होते. आपल्या महाराष्ट्रात देशाच्या एकूण उत्पादनापैकी 40% एवढे उत्पादन घेतले जाते.

म्हणजेच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे यावर अर्थकारण अवलंबून आहे. दरम्यान राज्यासह संपूर्ण देशभरातील सोयाबीन उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे इंदोर येथील कृषी शास्त्रज्ञांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोयाबीनच्या तीन नवीन जाती विकसित केल्या आहेत. NRC 181, 188 आणि 165 या नव्याने विकसित झालेल्या सोयाबीनच्या तीन जाती आहेत.

मात्र या जातींची अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही. तथापि, या जातींसाठी पुढील वर्षी अधिसूचना जारी होईल आणि हे वाण पुढील वर्षी शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता आपण या तिन्ही जातींच्या विशेषता थोडक्यात पाहणार आहोत.

NRC 165 : सोयाबीनची ही एक नव्याने विकसित झालेली जात आहे. या जातीची विशेष गोष्ट म्हणजे ती स्टेम फ्लाय, सर्कल बीटल आणि पाने खाणाऱ्या अळीस प्रतिरोधक आहे. सोयाबीन NRC 165 ही मध्यवर्ती प्रदेशात वेळेवर पेरणीसाठी प्रस्तावित केलेली जात आहे. हा वाण लवकर परिपक्व होतो. या जातीचे पीक फक्त तीन महिन्यात परिपक्व होते आणि हेक्टरी 19 क्विंटल एवढे उत्पादन देते. 

NRC 181 : सोयाबीनची हा नवीन वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारा असा दावा होत आहे. याला पांढरी फुले असतात. पिवळ्या मोझॅकला हा वाण प्रतिरोधक आहे. ही जात Rhizoctonia एरियल ब्लाइट, चारकोल रॉट आणि अँथ्रॅकनोजला अतिसंवेदनशील आहे. हा वाण मध्य प्रदेशासाठी शिफारशीत आहे. या जातीचा परिपक्वता कालावधी 93 दिवसांचा आहे. या वाणातून सरासरी 16-17 क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

NRC 188 : सोयाबीनची ही तिसरी जात उच्च उत्पादनासाठी ओळखली जाणार आहे. ही जात हिरव्या शेंगाच्या उत्पादनासाठी तयार झाली आहे. या जातीची फुले जांभळी आहेत. या पिकाला हिरव्या गुळगुळीत शेंगा लागतात. या जातीच्या शेंगा वाटाणा शेंगा समान खाल्ले जाऊ शकते.

मध्य प्रदेशासाठी प्रस्तावित केलेला हा पहिला भाजीपाला प्रकार आहे. या जातीची परिपक्वता कालावधी 77 दिवस आहे. या जातींपासून हिरव्या शेंगाचे 46 क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळू शकते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा