सोयाबीन पेरणी केलीय ? मग कृषी तज्ज्ञांनी दिलेला ‘हा’ सल्ला एकदा वाचाच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Farming : महाराष्ट्रात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. ऑगस्ट महिन्यात म्हणजेच भर पावसाळ्यात पावसाने उसंत घेतली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरंतर, सध्या मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत पाहायला मिळत आहे.

अशा परिस्थितीत सोयाबीन पिकाला पावसाच्या पाण्याची नितांत गरज आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून आगामी काही दिवस पाऊस पडणार नसल्याचा अंदाज आहे. यामुळे सोयाबीन पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र 20 तारखे नंतर वातावरणात बदल होईल आणि पावसाला सुरुवात होईल असे मत काही हवामान तज्ञांनी व्यक्त केले आहे. निश्चितच जर आगामी काही दिवसात पाऊस झाला तर सोयाबीन पिकाला नवीन जीवदान मिळणार आहे. दरम्यान आज आपण सोयाबीन पिकासाठी घातक ठरणाऱ्या केसाळ अळीचा पिकावर प्रादुर्भाव झाला तर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले पाहिजे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

वास्तविक, सोयाबीन पिकावर आढळणारी ही अळी प्रामुख्याने सूर्यफूल पिकावर आढळते. या अळीचा सोयाबीन पिकावर फारसा प्रादुर्भाव होत नाही. पण हवामानातील बदलामुळे, सोयाबीन पीक पेरणीच्या वेळेत झालेल्या बदलामुळे आणि सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र वाढले असल्याने गेल्या हंगामापासून या अळीचा सोयाबीन पिकावर देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.

गेल्या हंगामात मराठवाड्यात या अळीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या हंगामात देखील या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या अळीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे या अळीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे अतिशय आवश्यक आहे.

अळीमुळे होते मोठं नुकसान

या अळीचा सोयाबीन पिकाच्या पानांवर प्रादुर्भाव होतो. ही अळी पानाच्या खालच्या बाजूला पुंजक्याच्या स्वरूपात अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या नवजात अळ्या पिवळसर रंगाच्या असतात. अळी प्रौढ झाली की अंगावर भरपूर केस येतात. अळी पानांचा हिरवा भाग खाते यामुळे पाने वाळतात आणि अळीचा प्रादुर्भाव वाढला की संपूर्ण पिकावरील पाने अळ्या कुरतडतात. यामुळे पिकातील प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादनात मोठी घट येते.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

या अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये ज्या शेतावर आधी सूर्यफुलाची लागवड केलेली असेल त्या शेतात सोयाबीनची लागवड करणे टाळावे असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच सोयाबीन पेरणी करताना सोयाबीन पिकाच्या कडेला सूर्यफुलाची लागवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्यास प्रादुर्भावग्रस्त पाने नष्ट करावेत असे सांगितले जात आहे.

रासायनिक नियंत्रण कस करणार 

या कीटकाचा पिकावर प्रादुर्भाव वाढला तर रासायनिक पद्धतीने नियंत्रण मिळवता येऊ शकते. मात्र आर्थिक पातळीच्यावर पिकाचे नुकसान झाले असेल तेव्हाच रासायनिक पद्धतीने नियंत्रण मिळवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या कीटकांवर रासायनिक पद्धतीने नियंत्रण मिळवण्यासाठी क्विनॉलफॉस २५ इसी ३० मिली १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तसेच या अळीचा प्रादुर्भाव खूपच जास्त असेल तर, क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के ३ मिली किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट १.९ टक्के ईसी किंवा फ्लुबेन्डामाईड ३९.३५ टक्के एस सी ३ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के इसी ७ मिली या पैकी एका कीडनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला कृषी तज्ञांनी यावेळी दिला आहे.