Soybean Farming : येत्या काही दिवसात मोसमी पावसाला सुरुवात होणार आहे. यामुळे जून महिन्यात सोयाबीन, कापूस अशा विविध पिकांच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण की आज आपण सोयाबीनच्या सुधारित जातींची माहिती पाहणार आहोत.
आज आपण ज्या जातींची माहिती जाणून घेणार आहोत त्या जाती 90 दिवसाच्या आत काढणीसाठी तयार होत असतात. यामुळे तीन महिन्यांच्या कालावधीतच शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया सोयाबीनच्या जातींची सविस्तर माहिती.
महाराष्ट्रात सोयाबीनचे 40 टक्के उत्पादन
सोयाबीन लागवडीबाबत बोलायचं झालं तर राज्यातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी भागात या पिकाची लागवड केली जाते. देशाच्या एकूण उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
आपल्या महाराष्ट्रात देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन घेतले जाते. उत्पादनाच्या बाबतीत आपल्या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर मध्यप्रदेश हे राज्य असून तेथे 45 टक्के उत्पादन घेतले जाते.
सोयाबीनच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
JS-2069 : सोयाबीनची ही एक सुधारित जात आहे. लवकर हार्वेस्टिंग साठी तयार होणारा हा वाण शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. जर तुम्हालाही लवकर हार्वेस्टिंग साठी रेडी होणाऱ्या जातींची लागवड करायची असेल तर या जातीचे पीक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
विशेष म्हणजे कमी कालावधीत तयार होणारे वाण असतानाही यापासून चांगले उत्पादन मिळत आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, पीक पेरणीनंतर अवघ्या 85 ते 90 दिवसांनी या जातीचे पीक परिपक्व होत असते. या जातीच्या पेरणीसाठी एकरी ४० किलो बियाणे लागते. या जातीपासून हेक्टरी 22-26 क्विंटल उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.
NRC 181 : ही देखील सोयाबीनची एक प्रमुख जात आहे. देशातील प्रमुख सोयाबीन उत्पादक पट्ट्यात या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. ही जात उच्च उत्पन्न देणारी जात मानली जाते. ही जात येलो मोज़ेक आणि टार्गेट लीफ स्पॉट या रोगांना प्रतिरोधक असल्याचे आढळले आहे.
भारतातील मैदानी प्रदेशात या जातीची प्रामुख्याने शेती केली जात आहे. या जातीचा पीक परीपक्व कालावधी हा 90 ते 95 दिवसांचा आहे. ही जात हेक्टरी 16 ते 17 क्विंटल पर्यंतचे उत्पादन देते.
बीएस ६१२४ : भारतातील प्रमुख सोयाबीन उत्पादक पट्ट्यात या जातीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या जातीची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
पीक पेरणीनंतर सरासरी 90 ते 95 दिवसात शेतकऱ्यांना या जातीपासून उत्पादन मिळते. हेक्टरी 20 ते 25 क्विंटल एवढे उत्पादन या जातीपासून मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. या जातीला जांभळ्या रंगाची फुले येतात.