चिंताजनक सोयाबीन पिकावर ‘या’ रोगाचा प्रादुर्भाव, असं मिळवा नियंत्रण, नाहीतर….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Crop Management : सोयाबीन हे शाश्वत उत्पादन देणारे पीक म्हणून ओळखले जाते. यामुळे सोयाबीन पिकाला पिवळं सोनं असं म्हणतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून हवामानात होत असलेल्या अमूलाग्र बदलामुळे सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.

यावर्षी देखील सोयाबीन पिकावर हवामानात झालेल्या बदलामुळे विविध रोगांचे संकट पाहायला मिळत आहे. खरंतर यावर्षी सोयाबीनची पेरणी ही पावसाच्या कमतरतेमुळे उशिराने झाली. यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले शिवाय आगमन झाल्यानंतर बराच काळ पाऊसच पडला नाही यामुळे यावर्षी सोयाबीन पेरणी करण्यासाठी जवळपास पंधरा ते वीस दिवसांचा उशीर झाला. सध्या स्थितीला सोयाबीनचे पिक जवळपास 60 ते 65 दिवसांचे झाले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

काही ठिकाणी सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत आहे तर काही ठिकाणी फुलोरा अवस्था संपून आता पिकाला शेंगा लागत आहेत. अशा या अवस्थेत मात्र मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही सोयाबीन उत्पादक पट्ट्यांमध्ये पिकावर मूळकूज अर्थातच चारकोल रूट या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायाला मिळत आहे.

यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आहे. दरम्यान आज आपण सोयाबीन पिकावर आलेल्या रोगावर कसं नियंत्रण मिळवलं पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक तर आधीच या हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन पिकाची अपेक्षित अशी वाढ पाहायला मिळत नाही.

अशातच आता पिकावर या चारकोल रोट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जर वेळेत लक्ष घातले नाही तर या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती आहे.

कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या रोगाचा प्रादुर्भाव दिसला की ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५ ते १० ग्रॅम प्रति लिटर पाणी असे प्रमाण घेऊन आळवणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असे केल्यास या रोगाचा प्रसार थांबेल असा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय, जर पिक फुलोरावस्थेत असेल किंवा शेंगा लागल्या असतील आणि पिकाला पाण्याचा ताण बसला असेल तर तात्काळ पिकाला पाणी देणे जरुरीचे आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पाणी देण्यासाठी पाण्याची उपलब्धता नसेल त्यांनी पोटॅशिअम नायट्रेट (१३.०.४५) या विद्राव्य खताची साधारणपणे १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करून घ्यावी, असे कृषी तज्ञांनी यावेळी नमूद केले आहे.