सोयाबीनवर ‘या’ घातक आजाराचा प्रादुर्भाव, असं नियंत्रण मिळवा, नाहीतर….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Crop Management : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपुढे एक नवीन संकट उभे राहिले आहे. एकतर आधीच यावर्षी मान्सूनचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. यंदा जून महिन्यात खूपच कमी पाऊस पडला होता. जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली.

यानंतर जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. यामुळे जून महिन्यातील पावसाची तूट बऱ्यापैकी भरून निघाली. मात्र अशातच ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा खंड घेतला. ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास 25 ते 26 दिवस पावसाचा खंड राहिला. यामुळे सोयाबीन पीक मोठ्या संकटात आले.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अनेक ठिकाणी सोयाबीन पीक करपले. मात्र या चालू सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने झाली. यामुळे सोयाबीन पिकाला पुन्हा एकदा नवीन जीवदान मिळाले आहे. अशातच राज्यातील मराठवाडा, विदर्भ या प्रमुख सोयाबीन उत्पादक भागांमध्ये सोयाबीन पिकावर येलो मोजॅक या रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.

यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आले आहेत. सोयाबीन पिकावर येणारा हा एक खूप घातक रोग आहे, या रोगावर जर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

या स्थितीत आज आपण या रोगावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी तज्ञ लोकांनी दिलेली माहिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

कसे करणार रोगाचे व्यवस्थापन

या रोगाचा प्रसार हा प्रामुख्याने पांढऱ्या माशी मुळे होतो. यामुळे या रोगावर जर नियंत्रण मिळवायचे असेल तर पांढऱ्या माशी वर नियंत्रण मिळवणे जरुरीचे राहते. यामुळे पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी तसेच इतर अन्य रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी २५ बाय १५ सें.मी. आकाराचे पिवळे चिकट सापळे लावण्याचा सल्ला तज्ञ लोकांनी दिला आहे. एकरी ३० ते ४० पिवळे चिकट सापळे लावल्यास या कीटकांवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येते.

याशिवाय, सूरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्कची फवारणी करण्याचा सल्ला तज्ञ लोकांनी दिला आहे.

तसेच पांढऱ्या माशीचे नियंत्रण करण्यासाठी क्विनॉलफॉस (२५ टक्के इसी) या कीटकनाशकाचा फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे कीटकनाशक 200 मि.लि. प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तसेच सोयाबीन पिकात नत्रयुक्त खतांचा वापर कमी प्रमाणात करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रासायनिक खतांचा वापर हा संतुलित प्रमाणात झाल्यास पांढरी माशी या कीटकावर आणि येलो मोजॅक या रोगावर नियंत्रण मिळवता येते.