Sorghum Farming : ज्वारी हे एक प्रमुख तृणधान्य पीक आहे. खरीप आणि रब्बी हंगामात उत्पादित होणारे हे एक प्रमुख भरड धान्य पिक असून महाराष्ट्रात ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. पण रब्बी हंगामात ज्वारीचे अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये.
मात्र जर शेतकरी बांधवांनी ज्वारीच्या सुधारित वाणाची पेरणी केली तर रब्बी हंगामातूनही ज्वारी पिकातून चांगले उत्पादन मिळू शकते. यामुळे आज आपण रब्बी हंगामात लागवडीस उपयुक्त ठरणाऱ्या ज्वारीच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत.
आज आपण पीकेव्ही क्रांती अर्थातच एके एस व्ही १३ आर या वाणाची विशेषता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरंतर, पीकेव्ही क्रांती हा रब्बी हंगामात महाराष्ट्रात उत्पादित होणारा एक प्रमुख वाण आहे. याची लागवड राज्यातील विविध भागात केली जाते. दरम्यान यावर्षी ज्वारीची लागवड वाढण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र शासनाने भरड धान्य उत्पादनाला चालना दिली आहे.
भरड धान्याची मागणी यामुळे वाढली आहे. शिवाय भरड जाण्याला चांगला बाजार भाव देखील मिळत आहे. वैश्विक पातळीवर भरड धान्य उत्पादनाला मागणी वाढली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर यंदा रब्बी हंगामात ज्वारीची लागवड किंचित वाढ होऊ शकते असा आशावाद व्यक्त होत आहे. यामुळे आज आपण पी के व्ही क्रांती या वाणाची विशेषता जाणून घेणार आहोत.
पीकेव्ही क्रांती वाणाची विशेषता
रब्बी हंगामासाठी हा एक उपयुक्त वाण आहे. मालदांडी – ३५ – १ या वाणाला हा एक चांगला पर्याय आहे. हा वाण मध्यम कालावधीत जवळपास 120 ते 122 दिवसात तयार होणारा आहे. महाराष्ट्रातील हवामान या जातीला विशेष पूरक आहे. या जातीपासून दर्जेदार धान्य उत्पादन आणि चाऱ्याचे उत्पादन मिळते.
म्हणून पशुपालक शेतकरी देखील या वाणाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मध्यम ते भारी जमिनीसाठी हा वाण विशेष उपयुक्त ठरतो. या जातीपासून हेक्टरी 25 ते 30 क्विंटल पर्यंतचे धान्य उत्पादन मिळू शकते असा दावा केला जातो. विशेष म्हणजे या जातीपासून हेक्टरी 70 ते 75 क्विंटल पर्यंत चाऱ्याचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.