मुलाच्या संपत्तीत आईचा की पत्नीचा कोणाचा सर्वाधिक वाटा ? कायदा सांगतो की..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Son Property Rights : भारतात कायद्याचे राज्य आहे. संपत्तीबाबत देखील आपल्या देशात वेगवेगळ्या कायदे तयार झाले आहेत. या कायद्यानुसारच प्रत्येकाला आपापला अधिकार मिळत असतो. कायद्याचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाच्या माध्यमातून संपत्तीचे अधिकार मिळवता येतात. त्याचप्रमाणे आपल्या देशात उत्तराधिकाराचे कायदेही अगदी स्पष्ट आहेत.

उत्तराधिकारी कायद्यानुसारच नागरिकांना आपले अधिकार मिळत असतात. खरेतर बहुतेक लोक त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या मालमत्तेचे वारस घोषित करतात, म्हणजेच ते त्यांच्या मालमत्तेची वाटणी करून देतात, जेणेकरून सदर व्यक्तीच्या मृत्यूनंतर संपत्तीच्या कारणांवरून भांडणे होऊ नये.

ज्याच्या नावावर मालमत्ता असते अशा मालमत्तेच्या मालकाला त्याची मालमत्ता ज्याला पाहिजे असेल त्याला देण्याचा पूर्ण अधिकार भारतीय कायद्याने प्राप्त झाला आहे. सहसा, अनेक लोक आपल्या मुलांना किंवा पत्नीला आपला उत्तराधिकारी बनवतात. मात्र असे असले तरी अनेकदा वारस घोषित न करता काही जण मरण पावतात.

अशावेळी मरण पावलेल्या व्यक्तीची संपत्तीवर त्याच्या आईचा जास्त अधिकार असतो की त्याच्या पत्नीचा? असा प्रश्न उपस्थित होतो. अनेकांच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मुलाच्या संपत्तीत आईला अधिकार मिळतो का?

अनेकांच्या माध्यमातून मुलाच्या संपत्तीत आईला अधिकार मिळतो का हा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान या प्रश्नाचे उत्तर भारतीय कायद्यातच दडलेले आहे. हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 मध्ये याबाबत महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये आईला मुलाच्या संपत्तीत अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

भारतीय कायद्यात जर मुलगा विवाहित असताना मरण पावला असेल तर संपत्तीची वाटणी कशी होणार याबाबत तरतूद करून देण्यात आली आहे. तसेच जर मुलगा अविवाहित असताना मरण पावला तर त्याच्या मालमत्तेची वाटणी कशा पद्धतीने होणार याबाबत देखील सविस्तर अशी तरतूद देण्यात आली आहे.

भारतीय उत्तराधिकारी कायद्यानुसार, आईला तिच्या मृत मुलाच्या मालमत्तेत तितकाच हिस्सा मिळतो जेवढा त्या मुलाच्या पत्नीला आणि मुलांना मिळतो. पतीच्या मालमत्तेची विभागणी केली गेली तर त्यांच्या पत्नीला त्या मालमत्तेत तिच्या मुलांइतकाच हक्क मिळतो. हिंदू उत्तराधिकार कायद्याचा कलम 8 हा असा महत्त्वाचा कलम आहे ज्यामध्ये मुलाच्या मालमत्तेवरील पालकांचे अधिकार स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत.

या कलमनुसार, आई मुलाच्या मालमत्तेची पहिली वारस असते, तर वडील मुलाच्या मालमत्तेचे दुसरे वारसदार असतात. म्हणजेच मुलाच्या संपत्तीसाठी पहिला वारसदार जर कोणी असेल तर ती त्याची आई असते. भारतीय उत्तराधिकारी कायद्यानुसार मृत व्यक्तीची आई, पत्नी आणि मुले हयात असतील तर मुलाच्या मालमत्तेमध्ये आई, पत्नी आणि मुले यांचा समान अधिकार असतो.

मिळालेल्या माहितीनुसार जर मुलगा विवाहित असेल तर त्याची पत्नी ही त्याच्या मालमत्तेची पहिल्या श्रेणीतील वारसदार बनते. अशावेळी मुलाच्या संपत्तीवर त्याच्या पत्नीचा आणि इतर अन्य वारसदारांचा समान अधिकार असतो.

मात्र जर मुलगा अविवाहित असेल तर अशावेळी त्याच्या संपत्तीवर त्याच्या आईचा आणि वडिलांचा अधिकार असतो. अशा प्रकरणांमध्ये मुलाच्या संपत्तीवर पहिला अधिकार त्याच्या आईचा असतो आणि दुसरा अधिकार त्याच्या वडिलांचा असतो. मात्र जर मयत मुलाची आई देखील हयात नसेल तर अशावेळी त्याच्या वडिलांना आणि इतर सह वारसदारांना अशी मालमत्ता हस्तांतरित होत असते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा