Solar Pump Anudan : शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप अनुदानावर उपलब्ध करून दिला जात आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी या अनुषंगाने ही योजना राबवली जात असून आज आपण या योजनेअंतर्गत सौर कृषी पंप मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांना किती अनुदान मिळते आणि त्यांना किती पैसा भरावा लागतो या संदर्भात सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शेतकऱ्यांना किती अनुदान मिळते
राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 90% पासून ते 95% पर्यंतचे अनुदान दिले जाते. एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 95% एवढे अनुदान मिळते म्हणजेच पाच टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावे लागते आणि इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदान मिळते म्हणजेच शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम भरावी लागते.
शेतकऱ्यांना एकूण किती रक्कम भरावी लागणार?
3 एचपीच्या सौर कृषीपंपाची किंमत जीएसटीसह 1,93,803 रुपये इतकी आहे. अशा परिस्थितीत जर ओबीसी आणि ओपन प्रवर्गातील शेतकऱ्यांना तीन एचपी क्षमता असणारा सौर कृषी पंप या योजनेतून बसवायचा असेल तर त्यांना १९३८० रुपये भरावे लागणार आहेत आणि एससी तसेच एसटी प्रवर्गातील अर्जदारांना 9690 भरावे लागणार आहेत.
पाच एचपीच्या कृषी पंपाबाबत बोलायचं झालं तर याची किंमत 2,69,746 रुपये इतकी आहे. अशा परिस्थितीत पाच एचपी च्या पंपासाठी ओबीसी आणि ओपन कॅटेगिरी मधील शेतकऱ्यांना 26 हजार 975 रुपये आणि एससी तसेच एसटी कॅटेगरी मधील अर्जदारांना 13488 रुपये भरावे लागणार आहेत.
शिवाय, साडेसात एचपीच्या कृषी पंपाची किंमत 3,74,402 रुपये इतकी आहे. अशा परिस्थितीत 7.5 एचपीचा पंप बसवण्यासाठी ओपन तसेच ओबीसी कॅटेगिरी मधील अर्जदारांना 37 हजार 440 आणि असते तसेच एसटी कॅटेगिरी मधील अर्जदारांना 18 हजार 720 रुपये भरावे लागणार आहेत.