Soap Making Business : तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय करायचा आहे का, मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की, आज आपण एका बिजनेस आयडिया बाबत माहिती जाणून घेणार आहोत.
आज आपण अशा एका बिजनेस बाबत माहिती पाहणार आहोत ज्यातून दर महिन्याला सहजतेने लाखो रुपये कमवता येणार आहेत. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देखील मिळणार आहे.
यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या लोकांकडे भांडवल नसेल त्यांना देखील या व्यवसायासाठी भांडवल मिळणार आहे. खरे तर खेड्यापाड्यापासून ते शहरांपर्यंत सर्वत्र साबणाचा वापर केला जातो. प्रत्येक घरात साबण वापरला जातो. यामुळे बाजारात त्याला मोठी मागणी असते.
अशा परिस्थितीत सोप मेकिंग बिझनेस म्हणजे साबण तयार करण्याचा बिजनेस सुरू केला तर या व्यवसायातून चांगली कमाई होऊ शकणार आहे. दरम्यान आज आपण सोप मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस बाबत महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा सुरु करणार हा व्यवसाय ?
सर्वप्रथम तुम्हाला व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यानंतर या बिझनेससाठी लायसन्स काढावे लागणार आहे. यानंतर मग या व्यवसायासाठी शेड तयार करावे लागेल. साबण बनवण्याचा कारखाना सुरु करण्यासाठी जवळपास 750 स्क्वेअर फूट जागा लागणार आहे.
यातील 500 स्क्वेअर फिट जागेवर शेड तयार होईल आणि बाकीची जागा ही मोकळी राहील. शेड तयार केल्यानंतर या व्यवसायासाठी तुम्हाला आवश्यक मशिनरीज खरेदी करावी लागणार आहेत.
किती खर्च करावा लागेल
हा संपूर्ण व्यवसाय सुरू करण्यासाठी साडे पंधरा लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. यामध्ये मशिनरीज, वर्किंग कॅपिटल आणि जागेचा खर्च देखील समाविष्ट राहणार आहे.
मात्र ही एक अंदाजीत रक्कम आहे यामध्ये कमी-अधिक होऊ शकते. तथापि, जर तुमच्याकडे एवढी गुंतवणूक नसेल तर तुम्ही पंतप्रधान मुद्रा योजने अंतर्गत या व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता.
तुम्हाला या व्यवसायासाठी घरातून फक्त 3.85 लाख रुपये इन्वेस्ट करावे लागणार आहे. उर्वरित रक्कम ही कर्जाच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे.
कमाई किती होणार ?
मुद्रा योजनेच्या प्रकल्प प्रोफाइल अहवालानुसार, या व्यवसायातून एका वर्षात सुमारे 4 लाख किलो उत्पादन तयार केले जाऊ शकते. ज्याचे एकूण मूल्य सुमारे 47 लाख रुपये असेल. खर्च आणि इतर दायित्वे भरल्यानंतर, तुम्हाला 6 लाख रुपयांचा वार्षिक नफा होईल.