Small Business Idea : आपल्यापैकी अनेकांचा स्वतःचा व्यवसाय असावा असे स्वप्न असेल. परंतु काही लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते असे वाटते. यामुळे काही लोक इच्छा असून देखील व्यवसाय सुरु करत नाहीत. मात्र असेही काही व्यवसाय आहेत जे की अगदी कमी गुंतवणुकीत सुरू होऊ शकतात.
दरम्यान आज आपण अशाच एका लो इन्वेस्टमेंट बिजनेस प्लॅनची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण ज्या बिजनेसची माहिती पाहणार आहोत त्यामधून खर्च कमी आणि कमाई जास्त होणार आहे. अवघ्या पंधरा हजार रुपयांच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू होऊ शकतो आणि यातून वर्षाकाठी लाखो रुपयांचा नफा कमावला जाऊ शकतो.
कोणता आहे तो व्यवसाय
आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो आहे वेस्ट मटेरियल रिसायकलिंग बिजनेसचा. खरंतर, अलीकडे बाजारात वेस्ट मटेरियल पासून तयार झालेल्या शोभेच्या वस्तूंना मोठी मागणी आली आहे. वेस्ट मटेरियल पासून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू तयार केल्या जात आहेत.
जर तुम्हालाही कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही देखील वेस्ट मटेरियल पासून शोभेच्या वस्तू तयार करून बाजारात याची विक्री करू शकता. वेस्ट मटेरियल पासून घर सजावटीच्या वस्तू, ज्वेलरी, पेंटिंग, खुर्च्या, टेबल अशा नानाविध वस्तू बनवल्या जात आहेत.
विशेष म्हणजे या वस्तूंना बाजारात मोठी डिमांड देखील आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही वेस्ट मटेरियल पासून वस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला चांगली कमाई होण्याची शक्यता आहे.
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करून तुम्ही पर्यावरणाचे संवर्धन तर करणारच आहात शिवाय यामुळे तुम्हाला एक उत्पन्नाचे मजबूत साधन देखील गवसणार आहे.
व्यवसाय कसा सुरू करणार
जर तुमच्या घराशेजारी ऐसपैस जागा असेल तर तुम्ही हा व्यवसाय त्या जागेवर सुरू करू शकता. किंवा तुम्ही यासाठी भाडेतत्त्वावर जागा घेऊन, शेड तयार करून हा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला या व्यवसायात कच्चे मटेरियल म्हणून टाकाऊ वस्तू वापरायच्या आहेत.
हे वेस्ट मटेरियल तुम्हाला थेट लोकांकडून प्राप्त होऊ शकते किंवा तुम्ही नगरपालिका अथवा महानगरपालिकेकडून वेस्ट मटेरियल घेऊ शकता. तुमच्या कामाचे वेस्ट मटेरियल तुम्हाला भंगाराच्या दुकानावर देखील मिळणार आहे. मात्र भंगाराच्या दुकानावरून जर तुम्ही वेस्ट मटेरियल घेतले तर तुम्हाला अधिकचा पैसा मोजावा लागू शकतो.
यामुळे तुम्ही थेट लोकांकडून वेस्ट मटेरियल खरेदी केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला स्वस्तात वस्तू तयार करता येतील आणि ग्राहकांना देखील कमी किमतीत नवीन तयार वस्तू विकता येतील. तुम्ही टाकाऊ वस्तूंपासून अनेक गोष्टी बनवू शकता. उदाहरणार्थ, टायरपासून बसण्याची खुर्ची बनवता येते.
Amazon वर त्याची किंमत 700 रुपये आहे. याशिवाय कप, वुडन क्राफ्ट, किटली, काच, कंगवा आणि इतर गृहसजावटीच्या वस्तूही बनवता येतात. दरम्यान, तुम्ही टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या या टिकाऊ वस्तू अमेझॉन फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाइन शॉपिंग साईटवर विकू शकता.