Small Business Idea : अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. तरुण वर्ग नोकरी ऐवजी व्यवसाय करण्यात अधिक इंटरेस्ट दाखवत आहेत. याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये नोकर कपात मोठ्या प्रमाणात झाली आहे. अनेक नामांकित कंपन्यांनी नोकर कपातीचा बडगा उगारला आहे.
खर्च कमी करण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून नोकर कपात केली जात आहे. यामुळे आता नोकरी ऐवजी स्वतःचा व्यवसाय करावा असे स्वप्न अनेकांचे आहे. मात्र असे असले तरी व्यवसाय करतानाही अनेक तरुणांना वेगवेगळ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
कोणता व्यवसाय करावा हा मोठा प्रश्न तरुणांपुढे आहे. तसेच काही तरुणांकडे व्यवसायाच्या कल्पना असतात मात्र त्यासाठी भांडवल नसते. यामुळे आज आपण कमी भांडवलमध्ये सुरू करता येणाऱ्या एका भन्नाट बिजनेस प्लॅन बाबत जाणून घेणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला ज्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत तो व्यवसाय तुम्ही भारतीय रेल्वेसोबत जुडून सुरू करू शकणार आहात. विशेष म्हणजे हा व्यवसाय फक्त 40 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत देखील सुरू होऊ शकतो.
कोणता आहे तो व्यवसाय ?
खरंतर भारतीय रेल्वे रेल्वे स्थानकांवर स्टॉलसह गाड्यांमध्ये पॅंट्री कारचा व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देते. रेल्वे स्थानकावर चहा नाश्त्याचा स्टॉल, बुक स्टॉल तसेच ट्रेनमध्ये पॅन्ट्री कारचा व्यवसाय चालू करण्यासाठी भारतीय रेल्वे इच्छुक लोकांसोबत करार करते.
म्हणजेच रेल्वे स्टेशनवर स्टॉल लावून इच्छुक व्यक्ती रेल्वे सोबत जुडून आपला व्यवसाय सुरू करू शकता. दरम्यान आता आपण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काय करावे लागेल किंवा रेल्वे स्टेशनवर स्टॉल लावण्यासाठी काय प्रक्रिया असते याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
रेल्वे स्थानकावर स्टॉल लावण्यासाठी काय करावे लागेल
जर तुम्हाला रेल्वे स्थानकावर फूड स्टॉल, चहा कॉफी स्टोल, बुक स्टॉल किंवा इतर आवश्यक वस्तूंचा स्टॉल लावायचा असेल तर यासाठी तुम्हाला एक विशिष्ट प्रक्रिया फॉलो करावी लागते. खरंतर भारतीय रेल्वे अशा प्रकारचे स्टॉल लावण्यासाठी निविदा काढते.
निविदा जाहीर झाल्यानंतर मग इच्छुक व्यक्तींना या निविदा प्रक्रियेत भाग घ्यावा लागतो. यामध्ये मग पात्र ठरलेल्या लोकांना या व्यवसायासाठी परवाना दिला जातो. दरम्यान यासाठी इच्छुक व्यावसायिकांना सुरुवातीला काही पैशांची गुंतवणूक देखील करावी लागते.
म्हणजेच रेल्वे यासाठी तुमच्याकडून एक डिपॉझिट रक्कम किंवा शुल्क वसूल करते. साधारणपणे 40,000 पासून ते तीन लाखांपर्यंतच शुल्क रेल्वे वसूल करते. मात्र रेल्वे स्थानकांनुसार यामध्ये कमी अधिक होऊ शकते.
पण जर तुम्ही रेल्वे स्थानकावर हा व्यवसाय केला तर निश्चितच तुम्हाला यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. याबाबतची सविस्तर माहिती रेल्वे विभागाशी संपर्क करून मिळवता येऊ शकते.