Small Business Idea : तुमच्याकडे जर पाच हजार रुपयांचे भांडवल असेल तर या भांडवलातून सुद्धा तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. तुमचा यावर विश्वास बसणार नाही मात्र आज आम्ही तुम्हाला असा एक बिजनेस सांगणार आहोत जो की फक्त पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करता येऊ शकतो.
अलीकडे विशेषता कोरोना काळापासून नोकरी ऐवजी व्यवसायाला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे. आता अनेक नवयुवक तरुण तरुणी व्यवसायाकडे वळत आहेत. सरकार सुद्धा व्यवसायासाठी प्राधान्य देते.
सरकारच्या माध्यमातून व्यवसायासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे एवढेच नाही तर व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना कर्ज देखील पुरवले जात आहे. महाराष्ट्रात देखील व्यवसायासाठी सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.
दरम्यान जर तुम्हालाही तुमचा स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण फक्त आणि फक्त पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करता येणाऱ्या एका बिजनेस ची माहिती पाहणार आहोत. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो आहे मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय.
कसा सुरु करणार हा व्यवसाय?
मेणबत्तीचा बिजनेस नेहमीच ट्रेंडिंग मध्ये असतो. मेणबत्तीची बारा महिने मागणी असते. साधी मेणबत्ती असो की कलरफुल मेणबत्ती, मेणबत्ती ला मार्केटमध्ये मागणी असतेच. सजावटीसाठी मेणबत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
बर्थडे, ऍनिव्हर्सरी असो किंवा छोटा मोठा फंक्शन असो प्रत्येक ठिकाणी मेणबत्तीची मागणी असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला नक्कीच चांगली कमाई होणार आहे.
किती गुंतवणूक करावी लागणार
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फार मोठी गुंतवणूक करावी लागत नाही. मात्र पाच ते दहा हजाराच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मेण हे कच्चे मटेरियल लागणार आहे. मेण आणून मग आगीत वितळवून आपण मोल्ड म्हणजे सांचा वापरून मेणबत्त्या तयार करू शकतो.
मेणबत्ती बनवण्याचा साचा तुम्हाला मात्र खरेदी करावा लागणार आहे. हा व्यवसाय जास्तीत जास्त पाच ते दहा हजाराच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात जर व्यवसाय करायचा असेल तर चाळीस ते पन्नास हजाराची गुंतवणूक तुम्हाला करावी लागणार आहे.
किती कमाई होणार?
हा बिजनेस सुरू केल्यानंतर आपल्याला हवे असल्यास आपण आपल्या सोयीनुसार रंगीत मेणबत्ती किंवा साधी मेणबत्ती तयार करू शकतो. 1 किलो मेणापासून 20 ते 25 मेणबत्त्यांची पाकिटे तयार केली जातात आणि या मेणबत्त्या दररोज 500 ते 1000 रुपयांना विकून महिन्याभरात आपण चांगले उत्पन्न मिळवू शकतो. म्हणजे या बिजनेस मधून तुम्ही वर्षाकाठी लाखो रुपयांची कमाई सहजतेने करू शकता.