Small Business Idea : अनेकजण नोकरी समवेतच छोटा-मोठा व्यवसाय करण्याचे स्वप्न पाहत असतात. नोकरीमधून मिळणाऱ्या पैशातून या महागाईच्या काळात घरगाडा चालवणे म्हणजेच मोठ्या आव्हानाचे काम आहे. हेच कारण आहे की, अनेकजण नोकरीसोबत स्वतःचा, छोटासा का होईना पण व्यवसाय करतात.
दुसरीकडे, काही लोकांनी नोकरीसोडून व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे जर तुम्हीही नोकरीसोबत एखादा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल किंवा पूर्णवेळ तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट बिजनेस प्लॅन घेऊन हजर झालो आहोत.
व्यवसाय म्हटलं की, सर्वप्रथम विचार येतो तो भांडवलाचा. लाखों रुपयांचे भांडवल प्रत्येकाकडेच उपलब्ध असणे अशक्य आहे. यामुळे अनेकांची इच्छा असतानाही त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही.
परंतु आज आपण अशा एका बिजनेसची माहिती जाणून घेणार आहोत जो व्यवसाय खूपच कमी गुंतवणुकीत सुरू होऊ शकतो आणि यातून या आजच्या आधुनिक युगात वार्षिक लाखो, करोड रुपयांचा टर्नओव्हर केला जाऊ शकतो.
कोणता आहे तो व्यवसाय ?
आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो आहे आर्टिफिशियल ज्वेलरी मेकिंग बिझनेस. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय उभारला जाऊ शकतो. यासाठी फक्त आणि फक्त 50,000 रुपयांपर्यंतची गुंतवणुकीची गरज भासते.
50,000 हा व्यवसाय सुरू होऊ शकतो आणि यातून महिन्याकाठी सहजतेने 30 हजारापासून ते पन्नास हजारापर्यंतची कमाई होऊ शकते. विशेष म्हणजे जर तुम्ही सुरू केलेला बिजनेस मोठ्या ब्रँडमध्ये परावर्तित झाला तर हा आकडा लाखोंच्या घरात जाणार आहे.
मागे आर्टिफिशियल ज्वेलरी बाबत आकडेवारी समोर आली होती. यानुसार या ज्वेलरीच्या वापरात तब्बल 85 टक्क्यांची मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. अलीकडे प्रत्येक फंक्शनला, सणासुदीला वेगळी ज्वेलरी परिधान करण्याचा ट्रेड महिलांमध्ये वाढला आहे.
शिवाय नवीन ट्रेंड नुसार वेगवेगळे ज्वेलरी पॅटर्न महिला वेअर करतात. यामुळे आर्टिफिशियल ज्वेलरीचे मार्केट दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात यामध्ये आणखी वाढ होणार आहे. परिणामी, या व्यवसायातून चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. या मार्केटचे भारतीय अर्थव्यवस्थेत म्हणजे जीडीपीमध्ये 5.9% एवढा वाटा आहे.
आर्टिफिशयल ज्वेलरी कुठे विक्री करणार ?
तुम्ही हा व्यवसाय ऑनलाइन किंवा ऑफलाइन सुरू करू शकता. ऑनलाइन तुम्ही तुमची स्वतःची वेबसाईट सुरू करू शकता किंवा इतर ई-कॉमर्स साइटवर तुम्ही तुमचे प्रॉडक्ट विकू शकता. ऑफलाइन जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या मार्केट प्लेस वर जाऊन तुमचे प्रॉडक्ट विकू शकणार आहात.
तुम्ही तुमचे स्वतःचे स्टोअर सुरू करू शकता. तुमच्या जवळच्या परिसरातील ज्वेलरी शॉपला भेट देऊन तुम्ही त्यांना तुमचे प्रॉडक्ट शोकेस म्हणून ठेवण्यासाठी देऊ शकता.
अर्थातच या प्रॉडक्टची मागणी पाहता हे प्रॉडक्ट विकणे अवघड नाहीये. त्यामुळे यातून होणारी कमाई देखील चांगली दमदार राहणार आहे. तरीही तुम्हाला मार्केटिंगवर विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.