Small Business Idea : अलीकडे वाढती महागाई पाहता अनेक जण नोकरी सोबतच छोटा मोठा व्यवसाय करण्याच्या विचारात आहेत. तसेच काही लोक डेलीच्या सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कामाऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. मात्र कोणता व्यवसाय सुरू करावा हे सुचत नाही. दरम्यान जर तुम्हीही अशाच विचारात असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे.
कारण की आज आपण अशा एका बिजनेसची माहिती जाणून घेणार आहोत जो की अवघ्या 50 हजार रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू करता येऊ शकतो. विशेष बाब अशी की, व्यवसाय सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून तुम्हाला कमाई देखील मिळू लागणार आहे.
कोणता आहे तो बिजनेस?
आम्ही ज्या बिजनेस बाबत बोलत आहोत तो व्यवसाय आहे आर्टिफिशियल ज्वेलरीचा. खरे तर पूर्वी भारतात सोने-चांदीचे दागिने आवडीने घातले जात असत. आता मात्र सोने-चांदीचे दागिने फक्त इन्वेस्टमेंट साठी बनवून ठेवले जातात.
दैनंदिन वापरासाठी किंवा फंक्शनमध्ये आता आर्टिफिशियल ज्वेलरी चा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. महिला आर्टिफिशियल ज्वेलरी वापराला विशेष प्राधान्य दाखवत आहेत. हेच कारण आहे की आर्टिफिशियल ज्वेलरीला मोठी मागणी आली आहे.
आर्टिफिशियल ज्वेलरी चे मार्केट दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही हा व्यवसाय चालू केला तर तुम्हाला चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय फक्त 50 हजाराच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकतो.
व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला मार्केटिंग वर विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. तुम्ही तयार केलेली आर्टिफिशियल ज्वेलरी तुम्ही तुमच्या लोकल मार्केटमध्ये थेट दुकानदारांना विकू शकता किंवा स्वतःचे शॉप ओपन करून थेट ग्राहकांना विकू शकता.
याशिवाय तुम्ही तुमचे प्रॉडक्ट ऑनलाईन देखील विकू शकता. यासाठी तुम्ही स्वतःची वेबसाईट तयार करू शकता किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या विविध शॉपिंग प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमच्या आर्टिफिशियल ज्वेलरी विकू शकता.
हा बिजनेस फक्त पन्नास हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकतो आणि यातून महिन्याकाठी वीस ते तीस हजार रुपयांची कमाई सहजतेने केली जाऊ शकते. जेव्हा तुमचा बिजनेस मोठा होईल तेव्हा कमाईचा हा आकडा देखील वाढणार आहे.